निवडणुकीसाठी १२ हजार इव्हीएमची व्यवस्था

By admin | Published: January 23, 2017 08:13 PM2017-01-23T20:13:35+5:302017-01-23T20:13:35+5:30

महापालिका निवडणूक : विभागातून ८,८९६ इव्हीएम मागविल्या

12 thousand EVM arrangements for the elections | निवडणुकीसाठी १२ हजार इव्हीएमची व्यवस्था

निवडणुकीसाठी १२ हजार इव्हीएमची व्यवस्था

Next
ापालिका निवडणूक : विभागातून ८,८९६ इव्हीएम मागविल्या
नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेच्या १२ झोनमधील मतदारांची संख्या विचारात घेता, नागपूर शहरात २८ं०० मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. यासाठी १२ हजार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (इव्हीएम) व्यवस्था केली जाणार आहे.
महापालिकेकडे १८३ कंट्रोल युनिट व ७०० इव्हीएम आहेत. परंतु मतदान कें द्रांची संख्या विचारात घेता, ३०३० कंट्रोल युनिट व १२ हजार इव्हीएमची गरज भासणार असल्याने नागपूर विभागातील वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर आदी जिल्ह्यातून ८,८९६ इव्हीएम मागविण्यात आल्या आहेत.
नागपूर शहरात २० लाख ९३ हजार ३९१ मतदार आहेत. यात १० लाख ७० हजार ८२८ पुरुष तर १० लाख २२ हजार ५०० महिला मतदार आहेत तसेच ६३ हजार तृतीयपंथी मतदार आहेत. महापालिका निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याने, २०१२ च्या तुलनेत यावेळी प्रभागातील उमेदवारांची संख्या अधिक राहणार आहे. एका इव्हीएमवर १५ उमेदवारांना मतदान करता येईल. त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास गरजेनुसार इव्हीएमची संख्या वाढविली जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

एका कंट्रोल युनिटला चार इव्हीएम
मतदान केंद्रावरील उमेदवारांची संख्या विचारात घेऊ न कंट्रोल युनिट व इव्हीएमची व्यवस्था केली जाणार आहे. एका कंट्रोल युनिटला चार इव्हीएम जोडता येतात. त्यानुसार कंट्रोल युनिट व इव्हीएमची व्यवस्था केली जाणार आहे.

चार रंगात बॅलेट
प्रभागातून चार सदस्य निवडून द्यावयाचे असल्याने मतदाराला प्रत्येक प्रभागात आरक्षणनिहाय अ,ब,क आणि ड अशा संवर्गातील उमेदवारांना मतदान करावयाचे आहे. त्यानुसार इव्हीएमवर चार रंगाचे बॅलेट राहणार आहे. एका संवर्गातील उमेदवार संपल्यानंतर त्याखाली थोडे अंतर सोडून दुसऱ्या संवर्गातील मतदानासाठी वेगळा रंग राहणार आहे.

नाकाबंदी करणार
महापालिका निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी भरारी पथके, व्हिडिओ कॅ मेरा पथकांची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी निवडणुकीच्या कालावधीत पोलीस विभाग गस्ती पथके तैनात करण्यात येतील. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी क रून वाहनांची तपासणी केली जाणार आहे.

Web Title: 12 thousand EVM arrangements for the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.