जेवणाच्या एका ताटाची किंमत 12 हजार रुपये! आपची शाही मेजवानी?
By admin | Published: April 8, 2017 08:04 PM2017-04-08T20:04:42+5:302017-04-08T20:07:26+5:30
इतर राजकीय पक्षांकडून होणाऱ्या पैशाच्या उधळपट्टीवर टीका करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत:च अडचणीत येण्याची शक्यता आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, 8 - इतर राजकीय पक्षांकडून होणाऱ्या पैशाच्या उधळपट्टीवर टीका करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत:च अडचणीत येण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या वाढदिवसाला देण्यात आलेल्या मेजवानीत जेवणाच्या ताटासाठी प्रत्येकी सुमारे 12 हजार रुपये मोजण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला आहे. त्यामुळे काही दिवसांवर आलेल्या एमसीडी निवडणुकीपूर्वी आपच्या अडचणीत वाढ झाली आहे.
भाजपा नेते विजेंद्र गुप्ता यांनी केजरीवाल यांच्या शाही जेवणावळीचे बील ट्विटरवर शेअर केले आहे. 12 फेब्रुवारी 2016 रोजी आयोजित या मेजवानीमध्ये आपचे आमदार, मंत्री आणि समर्थक सहभागी झाले होते. ट्विटरवर टाकलेल्या बिलामध्ये जेवणाच्या एका ताटाची किंमत 12 हजार 20 रुपये एवढी दर्शवण्याता आली आहे. अशा एकूण 30 ताटांचे 3 लाख 60 हजार 600 रुपयांचे बिल देण्यात आले तसेच यावरील 36 हजार रुपयांचा सेवाकर जोडल्यास एकूण 4 लाख रुपये मेजवानीवर खर्च झाले आहेत.
मात्रा आपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच हे बिल पाठवणाऱ्याविरोधात चौकशी सुरू केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीही हे आरोप फेटाळून लावताना एमसीडी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बिनबुडाचे आरोप पक्षावर केले जात असल्याचे म्हटले आहे.