व्याजाच्या आमिष दाखवून १२ महिलांना २९ लाखाचा गंडा
By admin | Published: June 26, 2016 08:43 PM2016-06-26T20:43:55+5:302016-06-26T20:43:55+5:30
जळगाव: दाम दुप्पट व भरमसाठ व्याजाचे आमिष दाखवून निमखेडी शिवारातील गोपाळपुरा, पोलीस लाईन व चंदू अण्णा नगरातील १२ महिलांची तब्बल २८ लाख ६४ हजार ५०० रुपयात फसवणूक झाली आहे. दरम्यान, फसवणूक झालेल्या महिला व त्यांच्या नातेवाईकांनी रविवारी तालुका पोलीस स्टेशन गाठून दोषी महिलांच्या अटकेसाठी पोलीस स्टेशनला गोंधळ घातला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी नंदा विजय जाधव व सविता संजय साळुंखे (दोन्ही रा.गोपाळपुरा, जळगाव) या दोन महिलांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
Next
ज गाव: दाम दुप्पट व भरमसाठ व्याजाचे आमिष दाखवून निमखेडी शिवारातील गोपाळपुरा, पोलीस लाईन व चंदू अण्णा नगरातील १२ महिलांची तब्बल २८ लाख ६४ हजार ५०० रुपयात फसवणूक झाली आहे. दरम्यान, फसवणूक झालेल्या महिला व त्यांच्या नातेवाईकांनी रविवारी तालुका पोलीस स्टेशन गाठून दोषी महिलांच्या अटकेसाठी पोलीस स्टेशनला गोंधळ घातला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी नंदा विजय जाधव व सविता संजय साळुंखे (दोन्ही रा.गोपाळपुरा, जळगाव) या दोन महिलांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.याबाबत पोलीस व फसवणूक झालेल्या महिलांनी दिलेली माहिती अशी की, नंदा जाधव ही गोपाळपुर्यात रघुनंदन महिला बचत गट व भीसी चालविते.तर सविता साळुंखे ही तिला मदत करते. प्रत्येकी पाच हजार रुपये महिना या प्रमाणे २० महिलांची भीसी आहे. नंदा जाधव ही भीसीचा व्यवहार पाहत असल्याने पहिली भीसी (एक लाख रुपये) तिला १० जून रोजी देण्यात आली. यापुर्वीचे भीसीचे व्यवहार सुरुळीत झाल्याने नंदा जाधव हिच्यावर विश्वास बसला होता.मुलीला हिरोईन बनविण्यासाठी घेतले पैसेनंदा जाधव व विजया रत्नाकर शिंपी (वय ३९ रा.गोपाळपुरा, जळगाव) यांची ओळख असल्याने जाधव ही सहा महिन्यापूर्वी विजया शिंपी यांच्याकडे आली होती. मुलगी पल्लवी हिला हिरोईन बनवायचे आहे. त्यासाठी मला पैशाची गरज आहे. बॅँक नियमानुसार मी तुम्हाला व्याज देईन असे आमिष दाखवून पैशाची मागणी केली. सविता साळुंखे हि देखील तिच्या सोबत होती. तुझे पैसे कुठे जाणार नाहीत, हवे तर माझ्या मध्यस्थीने पैसे दे असे म्हणत दोघींनी पैशासाठी तगादा लावला.दागिने गहाण ठेवलेसततच्या तगाद्यामुळे शिंपी यांनी एक लाख ७० हजार रुपये रोख व अंगावरील दागिने गहाण ठेवले. २६ एप्रिल २०१६ रोजी ६३ हजार, ३० मे २०१६ रोजी १५ हजार ५०० व ७९ हजार ५०० असे एकुण २ लाख ४९ हजार ५०० रुपये सविता साळुंखे हिच्या मार्फत नंदा जाधव हिला मुलांसमक्ष दिले. ठरलेल्या वेळेत पैसे दिले नाहीत म्हणून शिंपी यांनी जाधव साळुंखे हिच्याकडे तगादा लावला. यावेळी दोघीही एकमेकावर आरोप करु लागल्या व नंतर मी नंतर तुला पैसे देईन असे जाधव हिने सांगितले.