‘१२0 बीपीएम’ चित्रपटाला सुवर्णमयूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 04:22 AM2017-11-29T04:22:22+5:302017-11-29T04:22:46+5:30
इफ्फी महोत्सवात फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिल्लो यांच्या ‘१२0 बीट्स पर मिनिट’ या चित्रपटाने सुवर्णमयूर पुरस्कार पटकावला. कॅ नडाचे दिग्दर्शक अॅटोम इगोयान यांना जीवनगौरव तर बॉलिवूडचे सुपरस्टार बीग बी अमिताभ बच्चन यांना ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी आॅफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पणजी : इफ्फी महोत्सवात फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिल्लो यांच्या ‘१२0 बीट्स पर मिनिट’ या चित्रपटाने सुवर्णमयूर पुरस्कार पटकावला. कॅ नडाचे दिग्दर्शक अॅटोम इगोयान यांना जीवनगौरव तर बॉलिवूडचे सुपरस्टार बीग बी अमिताभ बच्चन यांना ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी आॅफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चीनचे दिग्दर्शक विवियान क्यू यांना उत्कृष्ट दिग्दर्शक, नाह्युएल पिरीझ बिस्कार्यात यांना उत्कृष्ट अभिनेता, तर मल्याळम अभिनेत्री पार्वथी टी. के. हिला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार आदी बॉलिवूड अभिनेत्यांनी समारोपास उपस्थिती लावली
होती.
दोनापॉल येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झालेल्या दिमाखदार सोहळ््यास कें द्रीय माहिती प्रसारणमंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते.
सुवर्णमयूर पुरस्काराची रोख ४0 लाख रुपयांची रक्कम निर्माता आणि दिग्दर्शक यांना विभागून देण्यात आली. सुवर्णमयूर स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. उत्कृष्ट दिग्दर्शकासाठी रुपेरी मयूर स्मृतिचिन्ह आणि १५ लाख रुपये रोख देण्यात आले. उत्कृष्ट अभिनेते आणि अभिनेत्रीसाठी रुपेरी मयूर स्मृतिचिन्ह आणि रोख १0 लाख रुपये देण्यात आले.
‘टेक आॅफ’ चित्रपटाला स्पेशल ज्युरी, ‘डार्क स्खूल’ चित्रपटासाठी बोलिव्हियन दिग्दर्शक किरो रुसो यांना रुपेरी मयूर पुरस्कार देण्यात आला.
मराठीची पताका
मनोज कदम दिग्दर्शित ‘क्षितिज’ या मराठी चित्रपटासाठी आयसीएफटी युनेस्को गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘बिग बी’ भारतीय सिनेसृष्टीचे पितामह!
अभिनेता अक्षयकुमार याने ‘बीग बीं’बद्दलची लहानपणातील आठवण सांगितली. १९८0 च्या दशकात मी जेमतेम बारा-तेरा वर्षांचा असताना काश्मिरमध्ये गेलो असता, तेथे अमिताभ यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग चालू होते. तेथे त्यांचा आॅटोग्राफ घेण्याचा मोह झाला म्हणून जवळ गेलो, तर अमिताभजी द्राक्षे खात होते. ते आॅटोग्राफ देत होते तेव्हा माझे लक्ष द्राक्षांवर होते. तेथे पडलेले एक द्राक्ष मी उचलल्याचे अमिताभजींनी हेरले आणि नंतर मला द्राक्षे पाठवून दिली. त्यांची
ही भेट अजूनही मी विसरलेलो नाही.
बिग बी अन् सलमान
एकाच व्यासपीठावर
समारोपास अमिताभ बच्चन व सलमान खान हे एकाच व्यासपीठावर दिसले. एरवी अमिताभ आणि सलमान काही वैयक्तिक कारणांमुळे एकमेकांना टाळतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमिताभ यांच्यासोबत जया बच्चन, अभिषेक आणि ऐश्वर्या यांनीही सोहळ्यात उपस्थित राहण्यास संमती दिली होती. संपूर्ण बच्चन परिवार येणार असल्याचे आयोजकांना कळविण्यात आले होते. मात्र सलमानही उपस्थित असेल याची कल्पना आल्यानंतर बच्चन कुटुंबीयांनी येण्याचे टाळले, असे बोलले जाते.
गोवा माझ्या हृदयात - अमिताभ
गोवा माझ्या हृदयात आहे. सात हिन्दुस्थानी चित्रपटाचे चित्रिकरण गोव्यात झाले, तेव्हापासून या प्रदेशाशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले, असे मनोगत अमिताभ बच्चन यांनी ‘इंडियन पर्सनॅलिटी आॅफ द इयर’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले.
एकता आणि एकात्मता अबाधित राखण्यासाठी सिनेमा हे प्रभावी माध्यम आहे. भारतीय सिनेसृष्टीचा मी लहानसा घटक आहे, याचा मला मोठा अभिमान आहे. आज समाजात एकात्मतेला बाधा आणणाºया अनेक गोष्टी घडतात. सिनेमाच्या माध्यमातून ती अबाधित राखता येते.