दुचाकीवरील तरुणांकडून 1.20 कोटी जप्त, पोलीस तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 10:03 PM2018-10-30T22:03:48+5:302018-10-30T22:04:49+5:30
पोलिसांनी शायनातगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तपासणी केली. त्यावेळी, दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन भुमाराज (25) आणि प्रेम (19) तरुणांचीही पोलिसांनी चौकशी केली.
हैदराबाद - तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून गैरप्रकारांवर आळाही घालण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी कामाला गती देण्यात येत आहे. हैदराबादच्या शायनातगंज पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पोलिसांनी वाहनांची झाडाझडती घेतली. त्यावेळी, पोलिसांनी या गाडीतून 1.20 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
पोलिसांनी शायनातगंज प्रभागात वाहनांची तपासणी केली. त्यावेळी, दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन भुमाराज (25) आणि प्रेम (19) तरुणांचीही पोलिसांनी चौकशी केली. त्या दरम्यान, तरुणांकडे 1.20 कोटी रुपये मिळाले. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून हवाला खात्यात या रकेमेची वर्गवारी केली आहे. तसेच याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. नुकतेच इब्राहिमपटन हद्दीतील गुरुनानक इंजिनिअरींग कॉलेजच्या वाहनांची पोलिसांनी तपासणी केली होती. त्यावेली टीआरएसचे माजी सरपंच पल्ले गोपाल राव यांच्या कारमध्ये 27.35 लाख रुपयांची रक्कम आढळून आली होती. त्यानंतर, पुढील कारवाईसाठी वाहनाच्या मालकास आयकर विभागाने ताब्यात घेतले होते. दरम्यान, तेलंगणात निवडणुकांचा काळ असल्याने हवाला रकमेची मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण होत आहे. यापूर्वी अदिलाबाद आणि हैदराबाद येथूनही पोलिसांनी रोख रक्कम जप्त केली होती.