टेक्नोफिलिया स्पर्धेत १२०० विद्यार्थ्यांचा सहभाग

By admin | Published: March 3, 2016 01:57 AM2016-03-03T01:57:09+5:302016-03-03T01:57:09+5:30

नारायणगाव : ध्येय निश्चित करून प्रयत्न केले तर यश हमखास मिळतेच, त्यासाठी बुद्धिमत्ता, कौशल्य यांचा योग्य समन्वय साधणे आवश्यक आहे़ अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याने आपल्यातील क्षमता तपासण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. त्यामुळे यशापयशाचा विचार न करता आपली क्षमता तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे़, असे प्रतिपादन जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ यांनी केले़

1200 students participated in the Technophilia competition | टेक्नोफिलिया स्पर्धेत १२०० विद्यार्थ्यांचा सहभाग

टेक्नोफिलिया स्पर्धेत १२०० विद्यार्थ्यांचा सहभाग

Next
रायणगाव : ध्येय निश्चित करून प्रयत्न केले तर यश हमखास मिळतेच, त्यासाठी बुद्धिमत्ता, कौशल्य यांचा योग्य समन्वय साधणे आवश्यक आहे़ अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याने आपल्यातील क्षमता तपासण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. त्यामुळे यशापयशाचा विचार न करता आपली क्षमता तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे़, असे प्रतिपादन जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ यांनी केले़
कुरण येथील जयहिंद पॉलिटेक्निकमध्ये टेक्नोफिलिया २०१६ या तांत्रिक स्पर्धा कौशल्य स्पर्धेत विविध महाविद्यालयातील १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता़ या स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण गुंजाळ यांच्या हस्ते झाले़ याप्रसंगी ते बोलत होते़ जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ़ सी़ एल़ धमेजानी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा़ डी़ एस़ गल्हे, संचालिका शुभांगी गुंजाळ, अजित गटे, महेंद्र चोरडीया व तंत्रनिकेतनचे प्ऱ.प्राचार्य योगेश गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते़
विभागवार घेण्यात आलेल्या स्पर्धा व त्यांचे विजेते पुढीलप्रमाणे- संगणक विभाग - ब्लाइंड कोडिंग- प्रथम क्रमांक-निकित बनकर, द्वितीय क्रमांक-अजिंक्य देवकर, तृतीय क्रमांक-रोहित वाव्हळ (जयहिंद पॉलिटेक्निक, कुरण), काउंटर स्ट्राइक- प्रथम क्रमांक- मयूर दिलगर, सौरभ खोजे, शुभम उपाध्ये, अक्षय देशमुख (आर्ट्स कॉमर्स कॉलेज संगमनेर), द्वितीय क्रमांक- आकाश शर्मा, संकेत गटकळ, उमेर इनामदार, आशिष कोंडे, तौफिक आतार (विद्या निकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बोटा), तृतीय क्रमांक- अविनाश यादव, अजिंक्य वाळुंज, अनस शेख, चेतन बांबळे (जयहिंद पॉलिटेक्निक कुरण),
स्थापत्य (सिव्हिल) विभाग - ब्रीज क्रिज- प्रथम क्रमांक-अविनाश भोर, शेख पानमंद, किरण भेके (जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कुरण), द्वितीय क्रमांक-मयूर नेहरकर, अनिकेत पवळे, सूरज सागळे (जयहिंद पॉलिटेक्निक, कुरण), तृतीय क्रमांक-सागर राक्षे, निनाथ मोजाड, सुशील नायकोडी (जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कुरण), कॅड डिझाइन- प्रथम क्रमांक- अक्षय कहाणे (प्रवरा कॉलेज लोणी), द्वितीय क्रमांक- अभिषेक नायकोडी (जयहिंद पॉलिटेक्निक, कुरण), तृतीय क्रमांक- अजय गायकर (जयहिंद पॉलिटेक्निक कुरण),
मेकॅनिक विभाग - लेथ चॅम्पीयन- प्रथम क्रमांक-अजय आमले (जयहिंद पॉलिटेक्निक कुरण), द्वितीय क्रमांक-संदेश वायकर (जयहिंद पॉलिटेक्निक कुरण), तृतीय क्रमांक-युवराज पिंगळे (जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कुरण), ॲटोकॅड किंग- प्रथम क्रमांक-सचिन वाळुंज (जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कुरण), द्वितीय क्रमांक-अनिकेत डोके (जयहिंद पॉलिटेक्निक कुरण), तृतीय क्रमांक-संकेत कांबळे (जयहिंद पॉलिटेक्निक, कुरण),
इलेक्टॉनिक्स विभाग - पॅन्झर्स- प्रथम क्रमांक- आदित्य देवकर, गणेश मुळे, शुभम कामटकर (जयहिंद पॉलिटेक्निक द्वितीय क्रमांक-निखिल दप्तरे, स्वप्निल चासकर, माधुरी रोकडे (जयहिंद पॉलिटेक्निक, कुरण), तृतीय क्रमांक-किरण काळे, अमर जगताप, ज्योती काशिद (जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कुरण), सर्किंटेक्स- प्रथम क्रमांक-विश्वजित जगताप, मंगेश गडदे, शुभम ढाकणे (शासकीय तंत्रनिकेतन अवसरी), द्वितीय क्रमांक-अमोल सरोदे, सिद्धेश हांडे, योगेश गायकवाड (जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कुरण), तृतीय क्रमांक-सोनाली खंडागळे, प्रियांका शेटे, सुमीत चव्हाण (जयहिंद पॉलिटेक्निक, कुरण),
प्रश्नमंजूषा- प्रथम क्रमांक-आकांक्षा जाधव, श्रद्धा वाळुंज, आकांक्षा नेहरकर (जयहिंद पॉलिटेक्निक, कुरण), द्वितीय क्रमांक-श्रेयश बढे, अनास शेख, अजिंक्य वाळुंज (जयहिंद पॉलिटेक्निक, कुरण), तृतीय क्रमांक-प्रीतम भास्कर, संतोष गायकवाड, ओंकार डुंबरे (जयहिंद पॉलिटेक्निक, कुरण),
धमेजानी म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे व त्यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन जयहिंद पॉलिटेक्निक करीत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे़ या तांत्रिक स्पर्धामध्ये तांत्रिक कौशल्यावर आधारित विविध गेम्स, प्रश्नमंजूषा; तसेच पेपर प्रेझेंटेशनचाही समावेश होता़, अशी माहिती धमेजानी यांनी दिली़
स्पर्धांसाठी डिजिटेक इक्वि पमेंट्स पुणे, व्हिजन कॉम्प्युटर नारायणगाव, ईआयई इन्स्ट्रुमेंट्स पुणे, झकास रेडिमेड्स नारायणगाव, आशुतोष इलेक्ट्रिकल नारायणगाव, भावना फ्लेक्स नारायणगाव, यशस्वी इलेक्ट्रॉनिक्स पुणे, संपत स्पोर्ट्स नारायणगाव, जयहिंद कॅफे कुरण यांनी प्रयोजकत्व दिले होते़ या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून प्रा़ व्ही़ एम़ धेडे, प्रा. एस़ एस़ यादव, प्रा़ डी़ एऩ वाव्हळ, प्रा़ सी़ एस़ आर्यन, प्रा़ व्ही.जी़ बेनके यांनी काम पाहिले़ या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केल्याची माहिती स्पर्धेचे समन्वयक प्रा़ एऩ एस ़चिखले यांनी दिली़

( सचिन कांकरीया)

-----------------------------------------------------------------------------------------

Web Title: 1200 students participated in the Technophilia competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.