दुसऱ्या टप्प्यात १,२१० उमेदवार; अनेक दिग्गजांचा हाेणार फैसला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 06:10 AM2024-04-10T06:10:16+5:302024-04-10T06:11:09+5:30
सर्वाधिक उमेदवार केरळमध्ये; अनेक दिग्गजांचा हाेणार फैसला
नवी दिल्ली : लाेकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील लढतींचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. या टप्प्यात एकूण १,२१० उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक उमेदवार केरळमध्ये असून, या राज्यातील सर्व २० जागांवर एकाच दिवशी मतदान हाेणार आहे. दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी, लाेकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक दिग्गजांचा फैसला हाेणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा साेमवारी अखेरचा दिवस हाेता. एकूण २,६३३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. अर्ज माघारीनंतर अखेर १,२१० उमेदवार रिंगणात राहिले. पहिल्या टप्प्यात १,६२५ उमेदवार रिंगणात आहेत.
२६ एप्रिल राेजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान हाेणार आहे.
८९ मतदारसंघ या टप्प्यातील मतदानात आहेत.