तीन वर्षात १२४ कोटींच्या बनावट नोटा जप्त
By Admin | Published: July 18, 2014 03:50 PM2014-07-18T15:50:01+5:302014-07-18T15:50:01+5:30
भारतात बनावट नोटा मोठया प्रमाणात चलणात येत असून गेल्या तीन वर्षात १२४ कोटी रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १८ - भारतात बनावट नोटा मोठया प्रमाणात चलणात येत असून गेल्या तीन वर्षात १२४ कोटी रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली असून २०१४ या वर्षी आत्तापर्यंत १२ कोटी रूपयांच्या बनावट नोटा पोलिसांकडून जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भारताची आर्थिक घडी विस्कटण्यासाठी भारताच्या शेजारील देशांकडून मोठया प्रमाणात बनावट नोटा भारतात आणल्या जात आहेत. परंतू अर्थ मंत्रालय, गृह मंत्रालय रिझर्व्ह बँक, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अतिदक्षतामुळे बनावट नोटा चलनात आणू पाहणा-या नेटवर्क यांना आळा घालण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत २०१२ साली सर्वाधिक ४५.२४ कोटी रूपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या असून २०१३ साली ३८.६४ कोटी, २०११ साली २७०९ कोटी रूपये जप्त केले असून यावर्षी ३० जून पर्यंत ११.८६ कोटी रूपये जप्त केल्याचे जेटली यांनी सांगितले.