‘यूपीए’च्या तुलनेत आता महाराष्ट्रात १२४ टक्के अधिक रेल्वे लाइन, मोदी सरकारची कामगिरी उल्लेखनीय; राज्याला दिलेला निधीही वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 06:56 AM2022-02-05T06:56:18+5:302022-02-05T06:58:28+5:30

Indian Railway: राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोओ) महाराष्ट्रात वर्ष २०१४-२०२१ या कालावधीत दरवर्षी सरासरी १३०.८६ किलोमीटरचे रेल्वेमार्ग कार्यान्वित केले. २००९-२०१४ या कालावधीत हेच काम ५८.४ किलोमीटर एवढेच होते.

124% more railway lines in Maharashtra now than in UPA, Modi government's performance is remarkable; Funding for the state also increased | ‘यूपीए’च्या तुलनेत आता महाराष्ट्रात १२४ टक्के अधिक रेल्वे लाइन, मोदी सरकारची कामगिरी उल्लेखनीय; राज्याला दिलेला निधीही वाढला

‘यूपीए’च्या तुलनेत आता महाराष्ट्रात १२४ टक्के अधिक रेल्वे लाइन, मोदी सरकारची कामगिरी उल्लेखनीय; राज्याला दिलेला निधीही वाढला

googlenewsNext

- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोओ) महाराष्ट्रात वर्ष २०१४-२०२१ या कालावधीत दरवर्षी सरासरी १३०.८६ किलोमीटरचे रेल्वेमार्ग कार्यान्वित केले. २००९-२०१४ या कालावधीत हेच काम ५८.४ किलोमीटर एवढेच होते. वर्ष २००९-२०१४ दरम्यान संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कारकीर्दीत रेल्वेमार्ग कार्यान्वित होण्याची ही कामगिरी १२४ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
२०१४-२०२१ या कालावधीत ३१० ते ६२२ टक्के अशी थेट वृद्धी आहे. हा आश्चर्यजनक तपशील रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान यांच्यासह इतरांनी विचारलेल्या प्रश्नांना मिळालेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली. 

आकडे काय सांगतात?
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी वर्ष २०२१-२०२२मध्ये सर्वाधिक ८,५४७ कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले. ही तरतूद सरासरी वार्षिक खर्चाच्या तरतुदीच्या ६३० टक्क्यांपेक्षा जास्त होती.
- वर्ष २००९-२०१४ दरम्यान हीच रक्कम दरवर्षी १,१७१ कोटी रूपये होती. वर्ष २०१९-२०२० दरम्यान ७,२८१ कोटी रूपये दिले गेले. ही रक्कम २००९-२०१४ दरम्यानच्या वार्षिक सरासरी तरतुदीच्या ५२२ टक्क्यांपेक्षाही जास्त होती.
- वर्ष २०२१-२०२२ कालावधीत ६,७०० कोटी रूपये खर्च केले गेले. ही तरतूद २००९-२०१४ दरम्यानच्या वार्षिक सरासरी रकमेच्या तुलनेत ४७२ टक्के जास्त होती.

 

Web Title: 124% more railway lines in Maharashtra now than in UPA, Modi government's performance is remarkable; Funding for the state also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.