तिहार कारागृहातील १२५ कैदी HIV पॉझिटिव्ह, तुरुंग प्रशानसनामध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 07:50 PM2024-07-27T19:50:36+5:302024-07-27T19:51:03+5:30
Tihar Jail: देशातील प्रमुख तुरुंगांपैकी एक असलेल्या दिल्लीतील तिहार तुरुंगामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिहार तुरुंगामध्ये कैदेत असलेल्या कैद्यांमधील १२५ कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.
देशातील प्रमुख तुरुंगांपैकी एक असलेल्या दिल्लीतील तिहार तुरुंगामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिहार तुरुंगामध्ये कैदेत असलेल्या कैद्यांमधील १२५ कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. येथे कैदेत असलेल्या १० हजार ५०० कैद्यांची वैद्यकीय चाचणी कऱण्यात आली होती. त्यामध्ये या १२५ कैद्यांच्या रक्यांचे नमुने एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. तर २०० कैद्यांना सिफलिस असल्याचे समोर आले आहे. या तपासणीनंतर तुरुंग प्रशासनामध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून अधिक सतर्कता बाळगली जात आहे. दरम्यान, हे तेच कैदी आहे ज्यांना तुरुंगात आणण्यात आले होते तेव्हा त्यांच्यामध्ये एचआयव्ही विषाणू सापडेला होता, अशी माहितीही समोर येत आहे.
तिहार तुरुंगात कैदेमध्ये असलेल्या कैद्यांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी करण्यात येते. नवे डीजी आल्यानंतर येथील कैद्यांची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यामधून सध्या तुरुंगात कैदेत असलेल्या १२५ कैद्यांना एचआयव्हीचा संसर्ग असल्याचे समोर आले होते.
दरम्यान, नव्या डीजींनी दिलेल्या सल्ल्यानुसार तुरुंगातील प्रोटेक्टिव्ह सर्व्हे विभागाने एम्स आणि सफदरजंग रुग्णालयासोबत मिळून महिला कैद्यांचीही सर्व्हायकल कॅन्सरची तपासणी केली होती. तर ज्या पुरुष कैद्यांची वैद्यकीय चाचणी झाली. त्यामधील २०० कैद्यांनी सिफलिसचा आजार असल्याचे समोर आले. मात्र टीबीचा एकही रुग्ण तुरुंगात आढळला नाही.