१२६ तरुण अतिरेकी मार्गाला - मेहबुबा मुफ्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 03:21 AM2018-02-07T03:21:44+5:302018-02-07T03:22:50+5:30
जम्मू : गेल्या वर्षात काश्मीर खोर्यातील स्थानिक युवकांचे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. सन २0१७ मध्ये १२६ तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश घेतला. ही संख्या २0१६ पेक्षा ८८ ने अधिक होती, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
जम्मू : गेल्या वर्षात काश्मीर खोर्यातील स्थानिक युवकांचे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. सन २0१७ मध्ये १२६ तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश घेतला. ही संख्या २0१६ पेक्षा ८८ ने अधिक होती, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
संसदेला सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे स्थानिक तरुणांचे प्रमाण २0१४ नंतर कमालीचे वाढले आहे. सन २0११ ते २0१३ या काळात भरतीचे प्रमाण कमी होताना दिसले होते. सन २0११ मध्ये २३ तरुण दहतवादी संघटनांत सहभागी झाले, तर हाच आकडा २0१२ मध्ये २१ आणि २0१३ मध्ये १६ इतका होता.
मात्र, २0१४ मध्ये हा आकडा ५३ वर पोहोचला. पुढच्या तीन वर्षात हे आकडे अनुक्रमे ६६, ८८ व १२६ असे वाढत गेले. हिजबुल मुजाहिद्दिनचा म्होरक्या बुर्हान वणी लष्करी कारवाईत मारला गेल्यानंतर तरुणांचे हत्यार हातात घेण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. नव्वदच्या दशकात दहशतवादाकडे ओढले जाणारे तरुण वआताचे यात आमुलाग्र फरक आहे, असे अधिकार्यांचे म्हणणे आहे. सध्या दहशतवादी संघटनांत भरती होणारे तरुण आधीच्या तुलनेत कमालीचे कट्टर आहेत. त्यांना कारवायांमध्ये मारले जाण्याची अजिबात फिकीर नसते.
तुरुंगात २,६९४ कैदी
मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी असेही सांगितले की, राज्यात विविध तुरुंगांमध्ये २ हजार ६९४ लोक कैदेत आहेत. यात ९६ महिला आहेत. यातील आठ महिलांसह २८८ जणांवर दोष सिद्ध झाला आहे. अन्य २ हजार १५६ जणांवर खटले सुरु आहेत.
दगडफेकीत ११,५६६ जवान जखमी
तीन वर्षांत काश्मीरमध्ये दगडफेकीत ११ हजार ५६६ सुरक्षा जवान जखमी झाले असून, ११0 स्थानिक रहिवासी व दोन पोलिसांना जीव गमावले आहेत, अशीही माहिती मेहबुबा मुफ्ती यांनी दिली. या तीन वर्षांमध्ये दगडफेकीच्या ४७३६ घटना घडल्या. त्यात ९ हजार ६७0 पोलीस कर्मचारी आणि १ हजार ८९६ सुरक्षा जवान जखमी झाले.
५१५ घुसखोरांना अटक
नवी दिल्ली : लोकसभेत गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी सांगितले की, २0१७ मध्ये जम्मू-काश्मिरात ५१५ घुसखोरांना अटक करण्यात आली आणि ७५ अतिरेकी कारवाईत ठार झाले. सन २0१६ मध्ये सीमेवर घुसखोरी करणार्या ४५ अतिरेक्यांना यमसदनी धाडण्यात आले. सीमेवरुन होणारी घुसखोरी रोखण्यासाठी लष्कराने कडकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे, घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा अद्ययावत करण्यात आली आहे.