मोदींचं 129 जिल्ह्यांना खास गिफ्ट, जाणून घ्या पूर्ण लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 07:19 PM2018-11-22T19:19:34+5:302018-11-22T19:54:28+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 129 जिल्ह्यांना सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन(CGD) प्रोजेक्टची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 129 जिल्ह्यांसाठी सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन(CGD) प्रोजेक्टची घोषणा केली आहे. देशातल्या 19 राज्यांतील संपन्न झालेल्या नवव्या बिडिंग राऊंडमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय केंद्र सरकार देशातल्या 14 राज्यांतील 124 जिल्ह्यांमध्ये 50 नव्या जियोग्राफिकल एरिया(जीए)नुसार सीजीडी योजना लवकरच सुरू करणार आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातल्या 29 राज्यांतील प्रत्येक जियोग्राफिकल एरिया(जीए)साठी अधिकृत कंपनी स्थानिक स्तरावर या योजनेच्या कामाला सुरुवात करणार आहे. पेट्रोलियम अँड नॅच्युरल गॅस रेग्युलेटरी बोर्डा(पीएनजीआरबी)द्वारे ही गॅस पाइपलाइनची सुविधा 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या देशातल्या लोकसंख्येपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
देशातल्या या ठिकाणी सुरू होणार सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन योजना
आसाम- काचर, हेलकांडी आणि करिमगंज
बिहार- औरंगाबाद, कैमूर, रोहतास, बेगुसराय, गया आणि नालंदा
दमण आणि दीव (UT), गुजरात- दीव, गीर सोमनाथ
गुजरात- सुंदरनगर, बरवाला, रामपूर तालुका, नवसारी, सूरत, तापी, डांग, जूनागढ़, खेडा, मोरबी, मशीसागर, नर्मदा (राजपिपला), पोरबंदर
हरियाणा- पंचकुला, सिरमोर, भिवंडी, चरखी दादरी, महेंद्रगढ़, हिसार, सोनीपत, जिंद, नूह, पलवल
हिमाचल प्रदेश- शिमाल, सोलन, बिलासपूर, हमीरपूर, उना
झारखंड- बोकारो, हजारीबाग, रामगढ़, गिरिडीह, धनबाद
कर्नाटक- चित्रदुर्ग, देवांगिरी, उडुपी, बिल्लारी, गदाग, बिडर, दक्षिण कन्नड, रामानगर
केरळ आणि पुडुच्चेरी (UT)- कोच्चिकोड, वेयनाद, मलाप्पुरम, कन्नोर, कसारगोड, मही, पलाक्कड, थ्रिसूर
मध्य प्रदेश- भोपाल, राजगढ़, गुना, रीवा, सतना, शंडोल
महाराष्ट्र- अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
ओडिशा- अंगुल, धेकनाल, सुंदरगढ़, झारसुगुडा, बालसोर, भडरक, मयूरभंज, बारगढ़, देवगढ़, संभलपूर, गनजम, नयागढ़, पुरी, जगतसिंहपूर, केंद्रपारा, जाजपूर, केंदुझर
पुद्दुच्चेरी (UT) आणि तामिलनाडु- कराईकला आणि नागपत्तिनम
पुद्दुच्चेरी (UT)- पुद्दुच्चेरी
पंजाब- एसएएस नगर, पटियाला, संगरूर
राजस्थान- बारमेर, जैसलमेर, जोधपूर, अलवर, जयपूर, कोटा, चित्तौरगढ़ (सिर्फ रावतभाटा तालुका), भिलवाड़ा, बुंदी, चित्तौरगढ़ (रावतभाटाहून वेगळे), उदयपूर, धौलपूर
तामिलनाडू- कांचीपूरम, चेन्नई, तिरूवल्लुर, कोयंबटूर, कुड्डालोर, नगापटिनम, तिरूवरूर, रामनाथपूरम, सलेम, तिरूप्पुर
तेलंगणा- भडराडरी, कोथागुडेम, खम्मम, जगतिला, पेड्डापल्ले, करीमनगर अँड राजन्ना, सिरसिल्ला, जनगाव, जयाशंकर, बुपालपल्ली, महूबाबाद, वरांगल अर्बन एंड वारंगल रूरल, मेडक, सिड्डिपेट, संगारेड्डी, मेडचल रंगारेड्डी, विक्राबाद, नलगोंडा, सूर्यापेट, यदादरी भुवानागिरी
त्रिपुरा- गोमती, पश्चिम त्रिपुरा
उत्तर प्रदेश- बुलंदशहर, अलिगढ़, हाथरस, इलाहाबाद, भदोही, कौशांबी, अमेठी, प्रतापगढ़, राय बरेली, अरौया, कानपूर देहात, इटावा, फैजाबाद, सुल्तानपूर, गोरखपूर, संत कबीर नगर, कुशीनगर, मेरठ, मुजफ्फरनगरर, शामली, मोरादाबाद, उन्नाव
उत्तराखंड- डेहराडून
पश्चिम बंगाल- बर्धमान