इयत्ता १२वीच्या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न नकोतच

By admin | Published: November 2, 2016 04:15 AM2016-11-02T04:15:58+5:302016-11-02T04:15:58+5:30

बहुपर्यायी प्रश्नांमध्ये परीक्षार्थींकडून लबाडी केली जाण्याची शक्यता असल्याने उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतून (इयत्ता १२ वी) असे ‘मल्टिपल चॉईस क्वेश्चन’ अजिबात असू नयेत

In the 12th standard of the exam, there is no multinational question | इयत्ता १२वीच्या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न नकोतच

इयत्ता १२वीच्या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न नकोतच

Next


नवी दिल्ली : बहुपर्यायी प्रश्नांमध्ये परीक्षार्थींकडून लबाडी केली जाण्याची शक्यता असल्याने उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतून (इयत्ता १२ वी) असे ‘मल्टिपल चॉईस क्वेश्चन’ अजिबात असू नयेत आणि कोणत्याही विषयाचे थिअरी आणि प्रॉक्टिकलचे गुणांकन ७०:३० या प्रमाणात असावे, अशी शिफारस केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने नेमलेल्या समितीने केली आहे.
मंत्रालयाने गेल्या वर्षी २९ आॅक्टोबर रोजी देशातील सर्व शालेय शिक्षण मंडळांच्या अध्यक्षांची बैठक घेतली होती. दोन निरनिराळ््या मंडळांची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची तुलना करता येण्यासाठी काय करता येईल, यावर बैठकीत विचार झाला होता. त्यातून सर्व मंडळांनी एकाच धाटणीची प्रश्नपत्रिका तयार करण्याचा विचार पुढे आला होता.
इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी संपूर्ण देशाच्या पातळीवर एकाच धाटणीची प्रश्नपत्रिका कशी तयार करता येईल यासाठी ही समितीने नेमली गेली होती. मेघालय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ई.पी. कारभिह यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने अलीकडेच मंत्रालयास अहवाल सादर केला. त्यावर विचार सुरू आहे.
शालांत आणि उच्च माध्यमिक परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांना संदर्भासाठी पुस्तके पाहून उत्तरे लिहिण्याचा (ओपन बूक टेस्ट) पर्याय देण्यावरही मंडळांनी विचार करावा, असे त्या बैठकीत सूचविण्यात आले होते. कारभिह समितीकडे हा विषयही सोपविण्यात आला होता. परंतु समितीने ही कल्पना पूर्णपणे अमान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.
१०० गुणांपैकी ७० गुण थिअरीला व ३० गुण प्रॅक्टिकलला ठेवण्याच्या शिफारशीमागची भूमिका स्पष्ट करताना समितीचा एक सदस्य म्हणाला, प्रॅक्टिकलच्या परीक्षा शाळांकडूनच घेतल्या जातात. स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या भावनेतून शाळा प्रॅक्टिकल परिक्षांचे गुण देताना हात सढळ ठेवतात, असा सर्वसाधारण अनुभव आहे. सर्व मंडळांमध्ये गुणांचे प्रमाण समान ठेवून हा शाळासापेक्ष प्रभाव कमी करण्यासाठी असे करणे गरजेचे आहे.
सर्व ३७ शालेय परीक्षा मंडळांमध्ये इयत्ता १० व १२ वीच्या परीक्षांसाठी गणित आणि विज्ञान या विषयांसाठी काही मुलभूत असा समायिक अभ्यासक्रम ठेवता येईल का, यावर विचार करण्यासाठी मंत्रालयाने तेलंगण शिक्षण मंडळाचे सचिव ए. अशोक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. विज्ञान व गणित या विषयांचा ७० टक्के अभ्यासक्रम सर्व शिक्षण मंडळांमध्ये समान असावा व बाकीचा ३० टक्के अभ्यासक्रम आपल्या गरजेनुसार ठरविण्याचे मंडळंना स्वातंत्र असावे, असे अशोक समितीने सुचविले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>समितीच्या ठळक शिफारशी
प्रश्नपत्रिकेत दीर्घोत्तरी, लघुत्तरी आणि अतिलघुत्तरी प्रश्नांचे गुणोत्तर २:४:८ असे असावे.
शक्यतो अतिलघुत्तरी सर्व प्रश्न सोडविणे सक्तीचे असावे.
गणित, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि प्राणिशास्त्र या विषयांची परीक्षा १०० गुणांची असावी.
थिअरीला ७० व प्रॉक्टिकलला ३० गुण असावेत.
प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १५ मिनिटांचा वेगळा वेळ द्यावा.
१०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी तीन तासांचा वेळ असावा.
विविध विषयांच्या सामायिक मुलभूत अभ्याक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका तयार करावी.
प्रश्नपत्रिकेतील ३५ % प्रश्न सोपे, ४०% सरासरी व २५ % कठीण असावेत.

Web Title: In the 12th standard of the exam, there is no multinational question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.