१३ काेटी लाेक अत्यंत गरीब; १८१ रुपयांपेक्षाही कमी रोजची कमाई, दाेन वर्षांत गरिबीत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 08:49 AM2024-10-18T08:49:58+5:302024-10-18T08:50:39+5:30

विकसनशील मध्य उत्पन्न असलेल्या देशांसाठी गरिबीची मर्यादा ही दरराेज ५७६ रुपये दैनंदिन उत्पन्न एवढी आहे.

13 crore extremely poor; A daily income of less than Rs 181, poverty reduction in two years | १३ काेटी लाेक अत्यंत गरीब; १८१ रुपयांपेक्षाही कमी रोजची कमाई, दाेन वर्षांत गरिबीत घट

१३ काेटी लाेक अत्यंत गरीब; १८१ रुपयांपेक्षाही कमी रोजची कमाई, दाेन वर्षांत गरिबीत घट

नवी दिल्ली : भारतात १२.९ काेटी लाेक अतिशय दारिद्र्यात जीवन जगत असून, या लाेकांची दरराेजची कमाई अवघी १८१ रुपयांपेक्षाही कमी आहे. मात्र, २०२१च्या तुलनेत दारिद्र्यात राहणाऱ्या लाेकांच्या संख्येत ३.८४ काेटींनी घट झाली आहे. जगातील गरिबी हटविण्यासाठी या दराने अनेक दशके लागू शकतात, असे जागतिक बँकेने अहवालात म्हटले आहे.

विकसनशील मध्य उत्पन्न असलेल्या देशांसाठी गरिबीची मर्यादा ही दरराेज ५७६ रुपये दैनंदिन उत्पन्न एवढी आहे. १९९०च्या तुलनेत २०२४मध्ये जास्त भारतीय दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत. २०३०पर्यंत जगातून गरिबी हटविण्याचे लक्ष्य साध्य हाेताना दिसत नाही, असे अहवालात म्हटले आहे.

गरिबीत राहणारे लाेक -
(आकडेवारी काेटीमध्ये)
२०१७    १८.१ 
२०१८    १५.१७
२०१९    १७.६ 
२०२०    २०.५५ 
२०२१    १६.७४ 
२०२४    १२.९

अत्यंत गरीब किती?
- जगातील ७० काेटी जनता दरराेज ५७६ रुपयांपेक्षा कमी कमाई करत आहे. 
- लाेकसंख्या वाढीमुळे १९९०च्या तुलनेत सध्याच्या आकडेवारीत फार फरक आलेला नाही. 
- जगातील ८.५ टक्के म्हणजे, सुमारे ७० काेटी लाेकांचे उत्पन्न १८१ रुपयांपेक्षाही कमी आहे. 
- ७.३ टक्के लाेक वर्ष २०३०मध्ये अत्यंत गरिबीत राहत असतील.
- आफ्रिकेतील अनेक देशांसह विकसनशील देशांमध्ये अत्यंत दारिद्र्यात वाढ हाेणार आहे.
 

Web Title: 13 crore extremely poor; A daily income of less than Rs 181, poverty reduction in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत