ताब्यात घेतलेल्या १३ भारतीय जवानांची नेपाळकडून सुटका

By admin | Published: November 29, 2015 02:11 PM2015-11-29T14:11:20+5:302015-11-29T14:13:41+5:30

तेल तस्करांचा पाठलाग करणा-या भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या (एसएसबी) १३ जवानांना रविवारी सकाळी ताब्यात घेणा-या नेपाळने पारी सुटका केली.

13 Indian soldiers released from Nepal are released from Nepal | ताब्यात घेतलेल्या १३ भारतीय जवानांची नेपाळकडून सुटका

ताब्यात घेतलेल्या १३ भारतीय जवानांची नेपाळकडून सुटका

Next
>ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. २९ - तेल तस्करांचा पाठलाग करणा-या भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या (एसएसबी) १३ जवानांना रविवारी सकाळी ताब्यात घेणा-या नेपाळने अखेर आज दुपारी सुटका केली. भारत - नेपाळ सीमेवरून नेपाळच्या सीमा सुरक्षा दलाने (एपीएफ) आज सकाळी १३ भारतीय जवानांना ताब्यात घेतले होते, एसएसबीचे महासंचालक बी.डी.शर्मा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र काही काळानंतर त्या १३ जवानांना सोडून देण्यात आले. 
तेल तस्करांचा पाठलाग करताना भारतीय जवानांचे एक पथक नेपाळच्या सीमेत दाखल झाले. त्यानंतर नेपाळच्या बॉर्डर गार्ड्सनी त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन एपीएफच्या कॅम्पमध्ये ठेवण्यात आले. अखेर आज दुपारी त्यांची सुटका झाल्याची माहिती बी. डी. शर्मा यांनी दिली.
नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्यांवर बंदी
दरम्यान संपूर्ण नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. नेपाळ-भारत सीमेवर गेल्या अनेक महिन्यांपासून नाकेबंदी सुरू आहे. नेपाळच्या संसदेने स्वीकारलेल्या नव्या घटनेला मधेसींचा विरोध असून त्याच पार्शअवभूमीवर मधेसी नागिरकांनी सीमा बंद केली आहे. मात्र यासंबंधीची वृत्तं सतत भारतीय माध्यमांमधून झळकत असल्याने भारतीय वृत्त वाहिन्यांवर नेपाळमध्ये संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. 

Web Title: 13 Indian soldiers released from Nepal are released from Nepal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.