Video: BMW कारची काच फोडून लाखो रुपये लंपास; 58 सेकंदाचा थरार सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 04:01 PM2023-10-23T16:01:44+5:302023-10-23T16:02:53+5:30
Bengaluru News: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Theft in BMW Car: कर्नाटकची राजधानी बंगळुरुतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बीएमडब्ल्यू कारमधून सुमारे 14 लाख रुपयांची रोकड चोरल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक कार रस्त्यावर उभी असल्याचे दिसत आहे. यावेळी दोन तरुण दुचाकीवरुन कारजवळ येतात, एक तरुण खाली उतरतो आणि कारची काच फोडतो. यानंतर तो आत ठेवली 14 लाख रुपयांची बॅग घेऊन पसरा होतो. चोरीची ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून, व्हिडिओच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
#WATCH | Rs 13 lakhs stolen from a parked car in Bengaluru on 20th October; case registered, say police.
— ANI (@ANI) October 23, 2023
(Video source: Bengaluru Police) pic.twitter.com/u8V4K5tGzI
ही घटना घडली तेव्हा अनेक लोक कारपासून काही मीटर अंतरावर उभे होते, परंतु कोणालाच त्याची जाणीवही झाली नाही. ज्या कारमधून ही चोरी झाली ती BMW X5 असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क लावलेले होते, त्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.