परदेशी बँकांमध्ये भारतीयांचा १३ हजार कोटी रुपयांचा ब्लॅकमनी

By admin | Published: June 27, 2016 08:08 AM2016-06-27T08:08:20+5:302016-06-27T08:08:20+5:30

अघोषित उत्पन्न परदेशी बँकांमध्ये दडवून ठेवणा-यांविरोधात केंद्र सरकारने मोहीम उघडल्यानंतर महत्वपूर्ण माहिती आयकर खात्याच्या हाती लागली आहे.

13 million crores of black money in foreign banks | परदेशी बँकांमध्ये भारतीयांचा १३ हजार कोटी रुपयांचा ब्लॅकमनी

परदेशी बँकांमध्ये भारतीयांचा १३ हजार कोटी रुपयांचा ब्लॅकमनी

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २७ - अघोषित उत्पन्न परदेशी बँकांमध्ये दडवून ठेवणा-यांविरोधात केंद्र सरकारने मोहीम उघडल्यानंतर महत्वपूर्ण माहिती आयकर खात्याच्या हाती लागली आहे. २०११ आणि २०१३ मध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारावर केलेल्या तपासातून आयकर खात्याने १३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचा काळा पैसा शोधून काढला आहे. 
 
भारत सरकारला २०११ मध्ये फ्रेंच सरकारकडून जीनेव्हा येथील एचएसबीसी बँकेमध्ये असणा-या भारतीयांच्या खात्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे आयकर खात्याने केलेल्या तपासात भारतीयांचे ८,१८६ कोटी रुपयांचे  अघोषित उत्पन्न समोर आले. परदेशी बँकांमधील उघड झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम होती. 
 
या प्रकरणात ज्या भारतीयांची खाती होती त्यांच्यावर ३१ मार्च २०१६ पर्यंत ५३७७ कोटी रुपयांचा कर आकारणी करण्यात आली.  आयकर खात्याच्या करनिर्धारण अहवालातून ही माहिती समोर आली आहे. एचएसबीसीच्या प्रकरणात ६२८ बँक खात्याची सरकारला माहिती मिळाली. 
 
त्यातील २१३ खात्यांमध्ये कुठलाही व्यवहार सुरु नव्हता. एकतर त्यात पैसा नव्हता किंवा ती अनिवासी भारतीयांची होती. व्यवहार सुरु असलेल्या ३९८ खात्यांचा तपास करुन माहिती गोळा करण्यात आली. २०१३ मध्ये वॉशिंग्टन स्थित पत्रकारांच्या आयसीआयजे या संघटनेच्या संकेतस्थळावर काळाया पैशासंदर्भात माहिती प्रसिध्द झाली. 
 
त्या माहितीच्या आधारे आयकर खात्याला ७०० भारतीयांचे परदेशी बँकांमधील ५ हजार कोटींचे अघोषित उत्पन्न सापडले. आयसीआयजे प्रकरणात आयकर खात्याने कर चुकवेगिरी केल्या प्रकरणी न्यायालयात ५५ खटले दाखल केले आहेत. 
 

Web Title: 13 million crores of black money in foreign banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.