Atal Bihari Vajpayee Death: ...म्हणून वाजपेयींच्या आयुष्यात 13 क्रमांकाला होतं महत्त्वपूर्ण स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 06:13 PM2018-08-16T18:13:49+5:302018-08-16T18:29:52+5:30

वाजपेयींच्या राजकीय कारकिर्दीत 13 क्रमांकाला अनन्यसाधारण महत्त्व

13 number was very important for former prime minister atal bihari vajpayee | Atal Bihari Vajpayee Death: ...म्हणून वाजपेयींच्या आयुष्यात 13 क्रमांकाला होतं महत्त्वपूर्ण स्थान

Atal Bihari Vajpayee Death: ...म्हणून वाजपेयींच्या आयुष्यात 13 क्रमांकाला होतं महत्त्वपूर्ण स्थान

Next

नवी दिल्ली: माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय आयुष्यात 13 या क्रमाकांला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अटलबिहारी यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी या आकड्याभोवतीच फिरताना दिसतात. अनेकदा या क्रमांकामुळे वाजपेयींना फटका बसला. मात्र वाजपेयी याच आकड्याच्या मदतीनं त्यांनी अनेक संकटांवर मातही केली.

अटलबिहारी वाजपेयींनी 13 मे 1996 रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे 13 दिवसांमध्ये त्यांना पंतप्रधानपद सोडावं लागलं. वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी त्यांचं सरकार 13 महिन्यांमध्ये कोसळलं. वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी 13 पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता. 13 ऑक्टोबर 1999 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घ्यायची असं त्यांनी ठरवलं होतं. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. 13 क्रमांक तुमच्यासाठी अशुभ आहे, असं सहकाऱ्यांनी वाजपेयींना सांगितलं. मात्र तरीही वाजपेयींनी ऑक्टोबर 1999 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांना पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला. 

हिंदू धर्मात 13 आकडा महत्त्वपूर्ण
हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, 13 आकड्याला मोठं महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, तेरावा दिवस त्रयोदशीचा असतो. त्रयोदशी पवित्र समजली जाते. त्रयोदशीला शंकरासाठी उपवास केला जातो. सुखसमृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी या दिवशी व्रत केलं जातं. त्यामुळेच 13 या आकड्याला हिंदू धर्मात मोठं महत्त्व आहे. 

Web Title: 13 number was very important for former prime minister atal bihari vajpayee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.