१३ शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली फटाके न फोडण्याची शपथ
By admin | Published: November 7, 2015 12:03 AM2015-11-07T00:03:23+5:302015-11-07T00:03:23+5:30
जळगाव : दिवाळीच्या काळात फटाके फोडणार नाही...प्रदूषण होऊ देणार नाही...अशी शपथ शहरातील १३ शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
Next
ज गाव : दिवाळीच्या काळात फटाके फोडणार नाही...प्रदूषण होऊ देणार नाही...अशी शपथ शहरातील १३ शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली आहे. हरित सेना व सामाजिक वनीकरण विभागातर्फे हा उपक्रम विविध शाळांमध्ये राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. फटाके फोडल्यानंतर जो धूर तयार होतो. त्याचे दुष्परिणाम काय होतात? तसेच या धूरचा शरीरावर होणार दुष्परिणामाबाबत माहिती देण्यात आली. शहरातील ला. ना. सार्वजनिक विद्यालय, नूतन मराठा विद्यालय, मानव सेवा विद्यालय, खोटेनगर, खुबचंद सागरमल विद्यालय, ए. टी. झांबरे विद्यालय, रमाबाई आंबेडकर विद्यालय, भाऊसाहेब राऊत विद्यालय, सीताबाई गणपत विद्यालय, पी. एम. मुंदडे विद्यालय, पिंप्राळा, महाराणा प्रताप विद्यालय, जय दुर्गा माध्यमिक विद्यालय, राज माध्यमिक विद्यालय, बारी माध्यमिक विद्यालय, शिरसोली या शाळंमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. यशस्वीतेसाठी सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक संचालक मधुकर नेमाडे, प्रा. दिगंबर कट्यारे, सुभाष इंगळे व हरीत सेनेचे प्रशिक्षक प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले. दर्जी फाउंडेशनतर्फे सत्कार फटाके मुक्त अभियान राबविण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले. त्यांचा सत्कार दर्जी फाउंडेशनतर्फे ७ रोजी सकाळी ९.३० वाजता गोलाणी मार्केट येथील कार्यालयात केला जाणार आहे.