दहशतवादी हल्ल्यात 13 जवान जखमी

By Admin | Published: June 13, 2017 09:18 PM2017-06-13T21:18:40+5:302017-06-13T23:41:11+5:30

पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे सीआरपीएफच्या 180व्या बटालियनच्या तळावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकून हल्ला केला.

13 soldiers injured in militant attack | दहशतवादी हल्ल्यात 13 जवान जखमी

दहशतवादी हल्ल्यात 13 जवान जखमी

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 13 - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांच्या अनेक ठिकाणांवर हल्ले चढवले आहेत. सीआरपीएफ कॅम्प, पोलीस स्टेशनसारख्या 6 वेगवेगळ्या ठिकाणांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 13 सुरक्षा जवान जखमी झाले आहे. पाकिस्तानातील अल उमर मुजाहिद्दीन आणि जैश ए मोहम्मद यांनी या दहशतवादी संघटनांनी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे सीआरपीएफच्या 180व्या बटालियनच्या तळावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकून हल्ला केला. ग्रेनेडच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 10 जवान जखमी झालेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. दहशतवादी हल्ला केल्यानंतर सुरक्षा पथकाने त्रालमध्ये नाकाबंदी केली आहे. तसेच सीआरपीएफचे जवान दहशतवाद्यांचा कसून शोध घेत आहेत. सीआरपीएफच्या तळावरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 
तर गेल्या काही दिवसांपूर्वी काश्मीरमधल्या बंदीपोरामध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता,   त्या हल्ल्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 45व्या बटालियनच्या कॅम्पला लक्ष्य केलं होतं.
मात्र जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 4 दहशतवादी ठार झाले होते. त्यामुळे लष्करानं आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. तत्पूर्वी 3 जून रोजी लष्कराच्या ताफ्यावर अशाच प्रकारचा दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. तसेच जवळपास चार जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. अनंतनाग येथील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.

 

जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लष्कराचा ताफा राष्ट्रीय महामार्गावरून लोअर मुंडा येथून जात असताना दक्षिण काश्मीरजवळील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हल्ला चढवला", अशी माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिका-याने दिली होती. चार जवान जखमी झाले होते. गंभीररीत्या जखमी झालेले दोन जवान शहीद झाले होते. त्यावेळीही संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू होते. 

Web Title: 13 soldiers injured in militant attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.