१३ हजार कोटींचा काळा पैसा उघड

By admin | Published: June 28, 2016 04:25 AM2016-06-28T04:25:37+5:302016-06-28T04:25:37+5:30

विदेशी बँकांमध्ये अघोषित उत्पन्न दडवून ठेवणाऱ्यांवर सरकारने कारवाई सुरू करताच त्याची चांगली निष्पत्ती दिसू लागली

13 thousand crores of black money revealed | १३ हजार कोटींचा काळा पैसा उघड

१३ हजार कोटींचा काळा पैसा उघड

Next


नवी दिल्ली : विदेशी बँकांमध्ये अघोषित उत्पन्न दडवून ठेवणाऱ्यांवर सरकारने कारवाई सुरू करताच त्याची चांगली निष्पत्ती दिसू लागली असून, आयकर अधिकाऱ्यांना २०११ आणि १३मध्ये मिळालेल्या अवघ्या दोन माहितीसंचाच्या आधारे १३ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम हुडकून काढण्यात यश आले आहे.
किमान ४०० भारतीयांनी जिनेव्हातील एचएसबीसी बँकेत पैसा जमा केला असून, फ्रान्स सरकारने २०११मध्ये त्याबाबत माहिती दिली होती. त्या आधारावर आयकर अधिकाऱ्यांनी भारतीयांचा ८,१८६ कोटींचा अघोषित पैसा हुडकून काढला. हा पैसा गुंतवणाऱ्यांवर ३१ मार्च २०१६पर्यंत ५,३७७ कोटी रुपयांचा कर आकारण्यात आला असल्याचे आयकर आढावा अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एचएसबीसी बँकेकडून ६२८ बँक खातेधारकांची माहिती मिळाली आहे. त्यापैकी २१३ जणांवर कारवाई करता आलेली नाही, कारण त्यांच्याकडे एकतर पैसा नाही किंवा ते अनिवासी भारतीय आहेत. तर काही प्रकरणांमध्ये बचतकर्त्यांचा शोध घेता आलेला नाही. ३९८ प्रकरणांमध्ये आयकर समेट आयोगाने वाद मिटवला असून, आढाव्यासंबंधी
पुढील प्रक्रिया थांबविली असल्याचे अहवालात म्हटले आहे. एचएसबीसीच्या प्रवक्त्याने मात्र खातेधारकांबाबत भाष्य टाळले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
एक खिडकी योजनेचा लाभ नाही
आयसीआयजे संबंधी प्रकरणांमध्ये नाव आलेल्या काही भारतीयांनी २०१५मध्ये काळा पैसा स्वेच्छेने घोषित करण्यासंबंधी खिडकी योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आयकर विभागाने ज्यांच्याविरुद्ध आधीच तपास सुरू केला अशांना सरकारकडून कोणताही दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ७०० भारतीयांच्या विदेशी खात्यांमध्ये पाच हजार कोटी रुपये साठवल्याची माहिती आयकर विभागाने मिळवली. या विभागाने आंतरराष्ट्रीय न्यायालयांमध्ये सहेतुक कर बुडविण्याच्या आरोपांखाली ५५ जणांविरुद्ध तर जिनेव्हा बँक खात्यांबाबत ७५ खटले दाखल केले आहेत.

Web Title: 13 thousand crores of black money revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.