फसवणूक करणार्‍या महिलांचा कारागृहातील मुक्काम वाढला जामीन नाकारला : १३ महिलांना गंडविल्याचे प्रकरण

By Admin | Published: July 16, 2016 12:38 AM2016-07-16T00:38:58+5:302016-07-16T00:38:58+5:30

जळगाव : जास्तीचे व्याज व कमी मुदतीत दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून १३ महिलांची २८ लाख ६४ हजार रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ातील संशयित आरोपी नंदा विजय जाधव (वय ४५) व सविता संजय साळुंके (वय २८) दोन्ही रा.गोपाळपुरा, जळगाव यांना शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारला. त्यामुळे दोघींचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

13 women accused of sexually assaulting women | फसवणूक करणार्‍या महिलांचा कारागृहातील मुक्काम वाढला जामीन नाकारला : १३ महिलांना गंडविल्याचे प्रकरण

फसवणूक करणार्‍या महिलांचा कारागृहातील मुक्काम वाढला जामीन नाकारला : १३ महिलांना गंडविल्याचे प्रकरण

googlenewsNext
गाव : जास्तीचे व्याज व कमी मुदतीत दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून १३ महिलांची २८ लाख ६४ हजार रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ातील संशयित आरोपी नंदा विजय जाधव (वय ४५) व सविता संजय साळुंके (वय २८) दोन्ही रा.गोपाळपुरा, जळगाव यांना शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारला. त्यामुळे दोघींचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
नंदा जाधव हिच्या जामीन अर्जावर ११ जुलै रोजी सरकार पक्षातर्फे खुलासा सादर करण्यात आला होता. तर दुसरी संशयित आरोपी सविता साळुंके हिच्या जामीन अर्जावर १२ जुलै रोजी सरकारतर्फे खुलासा सादर करण्यात आला. दोघांच्या जामिनावर न्यायाधीश ए.के. पटणी यांच्या न्यायालयात युक्तिवाद झाला होता. शुक्रवारी न्यायालयाने दोघींचे जामीन अर्ज फेटाळून लावले. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके यांनी तर संशयितांतर्फे ॲड.अकील इस्माइल व ॲड.आनंद मुजुमदार तसेच मूळ फिर्यादीतर्फे ॲड.एस.एल. भुसारी यांनी कामकाज पाहिले.
पैशांची हमी म्हणून दिले धनादेश
तालुका पोलिसांनी दोघी संशयित आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून जाणून घेतलेली माहिती व प्राथमिक तपासात, त्यांनी अजून काही लोकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. दोघींनी जास्तीचे व्याज व दामदुप्पटचे आमिष दाखवून काही लोकांकडून पैसे घेतले असून पैशांची हमी म्हणून बॅँकांचे धनादेश दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. तपासात काही ठोस पुरावे हाती लागले तर या प्रकरणात अजून तक्रारदार व फसवणुकीच्या रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
जामीन नाकारण्याची मागणी
संशयित आरोपी व तक्रारदार महिला या एकाच परिसरातील रहिवासी आहेत. या प्रकरणामुळे दोघांच्या मनात एकमेकांविषयी असंतोष निर्माण झाला आहे. संशयित आरोपी महिलांना जामीन दिल्यास त्यांच्यात वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे संशयित महिला आरोपी या साक्षीदार महिलांवर दबाबदेखील आणू शकतात, म्हणून दोघींना जामीन नाकारावा, असा खुलासा या प्रकरणाच्या तपासाधिकार्‍यांनी न्यायालयात सादर केला होता. खुलासा मांडताना जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद ग्रा‘ धरून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Web Title: 13 women accused of sexually assaulting women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.