13 वर्षांच्या अक्षतनं ऑड-इव्हन.कॉम ही वेबसाईट विकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2016 12:45 PM2016-04-05T12:45:36+5:302016-04-05T13:57:20+5:30
अक्षत मित्तलनं सम-विषम सूत्र योग्यरीत्या लागू होण्यासाठी नव्या ऑड-इव्हन.कॉम ही वेबसाईट तयार
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. ५- १३ वर्षांच्या अक्षत मित्तलनं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सम-विषम सूत्र योग्यरीत्या लागू होण्यासाठी नव्या ऑड-इव्हन.कॉम ही वेबसाईट तयार केली होती.
या वेबसाईटच्या माध्यमातून तो सम-विषम गाड्या चालवणा-यांचं मार्गदर्शन करत होता. मात्र त्यानं आता ही वेबसाईट ऑर्ची.कॉम या कंपनीला विकली आहे. हा व्यवहार गुपित ठेवण्यात आला आहे. डिसेंबर २०१५ला ९ विद्यार्थ्यांच्या मदतीनं अक्षत मित्तलनं ही वेबसाईट तयार केली होती.
दिल्ली सरकारच्या सम-विषम सूत्रानुसार वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तो काम करत होता. अमेठी इंटरनॅशनल शाळेचे विद्यार्थीही या ऑर्ची.कॉम या कंपनीच्या सल्लागार बोर्डावर काम करणार आहेत. ही साईट मी बनवली असून, मी बोर्डाला मार्गदर्शन करत राहीन, असंही अक्षत मित्तल यानं सांगितलं आहे.