13 वर्षीय सागरचं वजन 140 किलो, सोशल मीडियावर शेतकरीपुत्र व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 01:04 PM2021-06-27T13:04:11+5:302021-06-27T13:17:50+5:30
गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील धारी गावचा रहिवाशी असलेल्या सागरवर उपचारासाठी मोठा खर्च होणार आहे. मात्र, घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्याच्या कुटुंबीयांना हा खर्च परवडणार नाही.
अहमदाबाद - गुजरातमधील 13 वर्षीय सागर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आपल्या वयाच्या तुलनेत अधिकपट वजन असल्याने सागर चर्चेचा विषय बनला आहे. सागरचे वय 140 किलो असून त्याला खाण्याचं फार वेड आहे आणि याच कारणामुळे त्याचं वजन इतकं वाढलं आहे, असं त्याच्या कुटुंबीयांना वाटतं. सामान्य कुटुंबातील सागरचा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील धारी गावचा रहिवाशी असलेल्या सागरवर उपचारासाठी मोठा खर्च होणार आहे. मात्र, घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्याच्या कुटुंबीयांना हा खर्च परवडणार नाही. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सागरचा जन्म झाला तेव्हा त्याचं वजन साधारण होतं. मात्र, त्याला लहानपणापासूनच वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवड होती. याच कारणामुळे हळूहळू त्याचं वजन वाढत गेलं. त्याची ही आवड नंतर सवयीत बदलली. त्यामुळे त्याच्या खाण्यावर नियंत्रण ठेवणंही कठीण होऊन बसलं.
सागरचं वजन अधिक असल्यानं त्याला भूक जास्त लागते. त्याची हीच भूक भागवण्यासाठी त्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कारण, त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. सागरचे वडिल शेतकरी 13 वर्षांचा सागर दिवसभरात बाजरीच्या तब्बल आठ भाकरी खातो. सागरचा आहार पाहून कुटुंबीयांनाही त्याच्या प्रकृतीची काळजी वाटत आहे. सोशल मीडियातूनही अनेकांनी त्याच्या वजनावरुन काळजी व्यक्त केली आहे. तर, काहींनी खिल्लीही उडवली आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने उपचारासाठीचा वैद्यकीय खर्च न परवडणार आहे, असे त्याचे कुटुंबीय म्हणतात