CAPF : सीएपीएफमधील १३१ जवानांची तीन वर्षांत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 06:18 AM2021-04-15T06:18:45+5:302021-04-15T06:20:22+5:30
CAPF : श्रीनगरमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २८ व्या बटालियनच्या कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आणि आरोग्याच्या प्रश्नांवर कार्यशाळा घेण्यात येत आहे.
श्रीनगर : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (सीएपीएफ) १३१ जणांनी तीन वर्षांत आत्महत्या केली. श्रीनगरमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २८ व्या बटालियनच्या कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आणि आरोग्याच्या प्रश्नांवर कार्यशाळा घेण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांना एका भांड्यातील चिठ्ठ्या दिल्या गेल्या व त्यांना असे विचारण्यात आले की, त्या चिठ्ठीत सांगितलेले काम पुरुष आणि महिला करू शकतील असा तुमचा विश्वास असेल, तर खोलीच्या मध्यभागी या.
हवालदार विनोद कुमार यांनी चिठ्ठी वाचली आणि ते पुढे आले. चिठ्ठीत लिहिले होते ‘पैसा कमवा आणि गुंतवा.’ लिंगभेदाच्या प्रश्नांवर त्यांना संवेदनशील बनवण्याचाही हेतू आहे. हा हेतू साध्य झाल्यास ते त्यांच्या घरी कुटुंबीयांसोबत अधिक चांगल्यारितीने जोडले जातील. हवालदार कुमार यांचे वय ४३ असून २३ वर्षांपासून ते सेवेत आहेत.
महिला व्यवसायात गुंतवणूक करताना मी पाहिल्या आहेत. माझी पत्नी हिमाचलमध्ये घरी कपडे शिवण्याचे काम करते. मी येथे काम करतो. तरी मी नेहमी घराबद्दल काळजी करीत असतो. या प्रशिक्षणाद्वारे मी सकारात्मक कसे राहावे, हे शिकत आहे.
-विनोद कुमार, हवालदार