१३४ कोटींच्या कर्जाचे पुनर्गठन १७ हजार शेतकर्यांना लाभ : १९३७ कोटींचे पीक कर्ज वाटप
By admin | Published: August 1, 2016 11:57 PM2016-08-01T23:57:33+5:302016-08-01T23:57:33+5:30
जळगाव : जिल्ातील १७ हजार ६३ थकबाकीदार शेतकर्यांच्या १३४ कोटी ८४ लाख रुपयांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. तर एक लाख ८५ हजार १८८ शेतकर्यांना १९३७ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.
Next
ज गाव : जिल्ातील १७ हजार ६३ थकबाकीदार शेतकर्यांच्या १३४ कोटी ८४ लाख रुपयांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. तर एक लाख ८५ हजार १८८ शेतकर्यांना १९३७ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.दुष्काळी परिस्थिती आणि ५० टक्के आणेवारी असलेल्या गावातील थकबाकीदार शेतकर्यांकडून कर्जाची सक्तीने वसुली न करता पीक कर्जाचे पुनर्गठन करावे अशी सूचना शासनातर्फे करण्यात आली होती. त्यानुसार पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ३१ जुलै अंतिम मुदत देण्यात आली होती.१३४ कोटींच्या थकीत कर्जाचे पुनर्गठनया वर्षी जिल्हा बँकेकडून तीन हजार ४६९ शेतकर्यांच्या १५ कोटी २२ लाखांच्या कर्जाचे पुनर्गठन केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकामार्फत १२ हजार ६३० शेतकर्यांच्या १११ कोटी ५१ लाखांच्या थकित कर्जाचे तर खाजगी बँकांकडून ९५७ शेतकर्यांच्या ८ कोटी १ लाखांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. ग्रामीण बँकेने ६ शेतकर्यांच्या ९ लाखांच्या कर्जाचे पुनर्गठन केले आहे.१९३७ कोटींचे पीककर्ज वाटप जिल्हा बँक व खाजगी बँकांकडून पीक कर्ज वाटपाला गती देण्यात आली आहे. जिल्हा बँकेतर्फे एक लाख २२ हजार ६२९ शेतकर्यांना ८९७ कोटी ९२ लाखांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकेतर्फे ५८ हजार ५३३ शेतकर्यांना ९७० कोटी ४५ लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. ग्रामीण बँकेतर्फे ५८३ शेतकर्यांना ८ कोटी ४३ लाख तर खाजगी बँकेकडून ३ हजार ४४३ शेतकर्यांना ६० कोटी २५ लाखांच्या रकमेच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. पीक कर्जवाटपाची अंतिम मुदत ही ३० सप्टेंबरपर्यंत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे शेतकर्यांना खरीप हंगामासाठी २६०६ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.