नाशकात १.३५ कोटींच्या बनावट नोटा जप्त

By admin | Published: December 23, 2016 06:56 PM2016-12-23T18:56:21+5:302016-12-23T18:56:21+5:30

पुणे आयकर विभाग व नाशिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून नाशिक, पुणे, मुंबईतील ११ संशयितांकडून गुरुवारी (दि.२२) मध्यरात्री १.३५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

1.35 crore fake currency seized in Nashik | नाशकात १.३५ कोटींच्या बनावट नोटा जप्त

नाशकात १.३५ कोटींच्या बनावट नोटा जप्त

Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 23 - पुणे आयकर विभाग व नाशिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून नाशिक, पुणे, मुंबईतील ११ संशयितांकडून गुरुवारी (दि.२२) मध्यरात्री १.३५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. अटक केलेल्या संशयितांमध्ये शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-याचा समावेश आहे.  दरम्यान, या संशयितांना न्यायालयात हजर केले असता २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार नाशकात कमिशनवर जुन्या नोटा बदलून देणे, बनावट नोटा चलनात वापरणे अशा प्रकारची कामे केली जात असल्याच्या तक्रारी आयकर विभाग व पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यातच नाशिककडे बनावट नोटा येणार असल्याची माहिती आयकर विभागाच्या पुणे येथील युनिट एकने पोलिसांना कळविली होती़ त्यानुसार पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आडगावचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर ही कामगिरीवर सोपविण्यात आली.
मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रासमोर धुळयाकडून येणारी स्कोडा  (एमएच १५, सीएम ७००२), फोर्ड फिगो (एमएच ०४, ईएफ ९७०१) व सियाझ (एमएच १५, एफएच २१११) या तीन चारचाकी वाहनांमधून १० - १२ इसम पाचशे व एक हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन येणार आहेत़ या जुन्या नोटांच्या बदल्यात गरजू इसमांना कमिशन देऊन त्यांच्याकडून नवीन नोटा घेणार असल्याच्या माहितीनुसार रात्री एक वाजेच्या सुमारास जत्रा हॉटेलच्यासमोर नाकाबंदी करून या तिन्ही गाड्या व त्यातील अकरा संशयितांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी अटक केलेले संशयितांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष छबु दगडू नागरे, नाशिक महापालिकेचा माजी घंटागाडी ठेकेदार रामराव तुकाराम पाटील, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा माजी सभापती रमेश गणपत पांगारकर, संदीप संपतराव सस्ते, ईश्वर मोहन परमार, राकेश सरोज परमार, नीलेश सतीश लायसे, प्रभाकर केवल घरटे, संतोष भिमा गायकवाड, गौतम चंद्रकांत जाधव, प्रवीण संजयराव मांढरे यांचा समावेश आहे़ या संशयितांकडून १़३५ लाख रुपयांचा नोटा जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये १ लाख ८० हजार रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा असून उर्वरीत सर्व नोटा बनावट आहेत.
दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या संशयित हे बनावट नोटा छापत असल्याची माहिती मिळाली असून त्या त्यांनी कुठे छापल्या, त्यासाठी कोणत्या यंत्रसामुग्रीचा वापर केला. तसेच यापुर्वी आणखी किती लोकांना बनावट नोटा देऊन फसविले याबाबत चौकशी सुरू आहे़ या सर्वांवर आडगाव पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी देढीया यांच्या न्यायालयात हजर केले असता २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

Web Title: 1.35 crore fake currency seized in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.