धक्कादायक! हॉस्टेलच्या जेवणातून 137 विद्यार्थ्यांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 11:09 AM2023-02-07T11:09:46+5:302023-02-07T11:11:27+5:30

एका खासगी नर्सिंग आणि पॅरामेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील मेसमध्ये अन्न खाल्ल्याने तब्बल 137 विद्यार्थी अचानक आजारी पडल्याची घटना समोर आली आहे.

137 students of private nursing paramedical college in Shakthinagar Mangaluru were admitted to hospitals | धक्कादायक! हॉस्टेलच्या जेवणातून 137 विद्यार्थ्यांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

धक्कादायक! हॉस्टेलच्या जेवणातून 137 विद्यार्थ्यांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

googlenewsNext

कर्नाटकातील मंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी नर्सिंग आणि पॅरामेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील मेसमध्ये अन्न खाल्ल्याने तब्बल 137 विद्यार्थी अचानक आजारी पडल्याची घटना समोर आली आहे. यानंतर तातडीने विद्यार्थ्यांना शहरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून, तेथे उपचार सुरू आहे. ही घटना मंगळुरूमधील शक्तीनगर भागातील आहे.

मंगळुरूच्या एसपींनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 2 वाजण्याच्या सुमारास सुमारे 137 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या तक्रारीची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. अनेक विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबही होऊ लागले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून विद्यार्थ्यांना तातडीने शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस या घटनेमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे एसपींनी सांगितले.

जिल्हा आरोग्य निरीक्षक डॉ. अशोक यांनी विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. यामध्ये काळजी करण्यासारखे काही नाही. ते पुढे म्हणाले, 'आम्ही वसतीगृहात जाऊन यासंदर्भात वॉर्डनशी बोलून संपूर्ण माहिती घेऊ. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती नीट असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: 137 students of private nursing paramedical college in Shakthinagar Mangaluru were admitted to hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.