शोधमोहिमेत १४ चंदनतस्कर ताब्यात
By admin | Published: April 9, 2015 12:41 AM2015-04-09T00:41:59+5:302015-04-09T00:42:22+5:30
चित्तूर जिल्ह्यात विशेष संयुक्त कृती दलासोबतच्या धुमश्चक्रीत २० रक्तचंदनतस्कर मारले गेल्यानंतर बुधवारी आंध्रप्रदेशच्या शेषाचलम जंगल
हैदराबाद : चित्तूर जिल्ह्यात विशेष संयुक्त कृती दलासोबतच्या धुमश्चक्रीत २० रक्तचंदनतस्कर मारले गेल्यानंतर बुधवारी आंध्रप्रदेशच्या शेषाचलम जंगल भागात शोधमोहीम राबविण्यात आली. कथितरीत्या रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या १४ जणांना ताब्यात घेण्यात आले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. चित्तूर जिल्ह्यातील शेषाचलम पर्वतीय जंगल भागात मंगळवारी पहाटे विशेष संयुक्त कृती दलाशी झालेल्या धुमश्चक्रीत २० रक्तचंदनतस्कर मारले गेले होते. सुमारे २०० तस्कर लाल चंदनाची झाडे कापताना आढळल्यानंतर पोलिसांनी त्यांना हटकत आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. मात्र, आत्मसमर्पण न करता या तस्करांनी पोलिसांवर हल्ला केला. यावेळी उडालेल्या धुमश्चक्रीत २० तस्कर ठार झाले होते. (वृत्तसंस्था)