उत्तर प्रदेशमधून अटक केलेल्या ISI एजंटला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
By admin | Published: May 4, 2017 06:20 PM2017-05-04T18:20:28+5:302017-05-04T18:20:28+5:30
उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानची गुप्तहेर संघटनेचा एजंट आफताब अली याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 4 - उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानची गुप्तहेर संघटनेचा एजंट आफताब अली याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने त्याला आज विशेष न्यायालयात हजर केले होते.
बुधवारी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक , राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि लष्कराच्या यंत्रणांनी संयुक्त कारवाईकरून फैजाबाद येथून पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयच्या एजंट आफताब याला अटक केली होती. तो फैजाबादमधील ख्वासपुरा येथील रहिवासी आहे. याशिवाय एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आलं होतं.
आफताब अली याने आयएसआयकडून हेरगिरीचे प्रशिक्षण घेतल्याचं वृत्त असून तो पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता अशी माहिती आहे . यापुढील काळात आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे. तो पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता आणि खोट्या नावाने त्यांच्याशी संपर्क साधत होता, अशी माहिती समोर आहे. आफताब अली पाकिस्तानचा व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, अनेकदा त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. त्याने आयएसआयसाठी काम करणार असल्याचे सांगितल्यानंतर त्याला व्हिसा मिळाला होता, असे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.