१४ मच्छीमारांना वाचविले

By Admin | Published: February 8, 2016 04:31 AM2016-02-08T04:31:50+5:302016-02-08T04:31:50+5:30

उत्तर गोव्याच्या किनाऱ्यापासून सुमारे ८0 किलोमीटरवर खवळलेल्या खोल समुद्रात बुडणाऱ्या ट्रॉलरवरील १४ मच्छीमारांचे प्राण तटरक्षक दलाने वाचविले

14 fishermen saved | १४ मच्छीमारांना वाचविले

१४ मच्छीमारांना वाचविले

googlenewsNext

वास्को (गोवा) : उत्तर गोव्याच्या किनाऱ्यापासून सुमारे ८0 किलोमीटरवर खवळलेल्या खोल समुद्रात बुडणाऱ्या ट्रॉलरवरील १४ मच्छीमारांचे प्राण तटरक्षक दलाने वाचविले. कन्याकुमारीतील ‘निक्सिमोळ’ ट्रॉलरमध्ये पाणी शिरले असून, तो बुडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती तटरक्षक दलाच्या मुंबईतील मुख्यालयास शनिवारी रात्री १०च्या सुमारास मिळाली. त्यानंतर तातडीने हालचाली करण्यात आल्या.
मुरगाव बंदरातील आयसीजीएस सी ४१0 नौका गोव्यातून रात्री मदतकार्यासाठी तातडीने रवाना झाली. ट्रॉलरपर्यंत पोहोचेपर्यंत तटरक्षक दलाचे जवान मच्छीमारांशी तसेच ट्रॉलरच्या मालकाशी सतत संपर्कात होते. ट्रॉलरमध्ये पाणी शिरू लागले होते, ते काढून टाकण्यासाठी खलाशांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या; पाणी इंजिनपर्यंत पोहोचले असते तर ट्रॉलर बंद पडून १४ही मच्छीमार बुडाले असते. ११ मच्छीमारांना तटरक्षक दलाच्या नौकेत घेण्यात आले आणि तीन मच्छीमारांना ट्रॉलरवर ठेवून तो ओढत पहाटे ५.१५च्या सुमारास गोवा बंदरात आणण्यात आला.तटरक्षक दलाचे उपकमांडर करण किशोर यांच्या नेतृत्वाखाली ए.के. शर्मा, एम. बॅनर्जी, बी. सेल्वाराज, आर.के. शर्मा, मुकेश कुमार, प्रवीण कुमार, व्ही.पी. प्रभू, एम.बी. मूर्ती आणि एम. मणिकंदन यांनी मदतकार्य राबविले.

Web Title: 14 fishermen saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.