१४ परदेश दौरे, ४७ वेळा दुबईतून लॉगइन, कॅश फॉर क्वेरी प्रकरणात अशा अडकल्या महुआ मोईत्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 20:42 IST2023-11-01T20:41:43+5:302023-11-01T20:42:08+5:30
Mahua Moitra: सध्या गाजत असलेल्या कॅश फॉर क्वेरी म्हणजेच संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे स्वीकारण्याच्या प्रकरणात खासदार महुआ मोईत्रा गुरुवारी सकाळी ११ वाजता एथिक्स कमिटीसमोर हजर राहणार आहेत.

१४ परदेश दौरे, ४७ वेळा दुबईतून लॉगइन, कॅश फॉर क्वेरी प्रकरणात अशा अडकल्या महुआ मोईत्रा
सध्या गाजत असलेल्या कॅश फॉर क्वेरी म्हणजेच संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे स्वीकारण्याच्या प्रकरणात खासदार महुआ मोईत्रा गुरुवारी सकाळी ११ वाजता एथिक्स कमिटीसमोर हजर राहणार आहेत. त्या कमिटीसमोर भाजपा खासदार निशिकांत दुबे आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहाद्राई यांनी केलेल्या आरोपांबाबत आपली बाजू मांडणार आहेत. मात्र या प्रकरणात दर्शन हिरानंदानी यांचीही उलट तपासणी करण्यात यावी अशी मागणी महुआ मोईत्रा यांनी समितीकडे केली आहे. याबाबत महुआ मोईत्रा यांनी एथिक्स कमिटीला पत्र लिहिलं आहे. संसदीय समितीला गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करण्याचा कुठलाही अधिकार नसतो, असा दावा त्यांनी पत्रामधून केला आहे.
दरम्यान, महुआ मोईत्रा यांनी खासदार म्हणून १४ परदेश दौरे केले आहेत. त्यांचा हिशोब त्यांनी दिलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दौऱ्यांची लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला माहिती देण्यात आलेली नाही. तसेच महुआ मोईत्रांच्या लोकसभा पोर्टलमध्ये ४७ वेळा लॉगइन केल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभेच्या एथिक्स कमिटीसमोर हजर राहण्यापूर्वी एक दिवस आधी महुआ मोईत्रा यांनी आज सांगतले की, त्या उद्दाया समितीसमोर हजर राहतील. मात्र त्यापूर्वीच त्यांनी एक पत्र सोशल मीडियावर टाकून समितीला पाठवलं आहे.