१३ हल्ल्यांत १४ जवान शहीद, घातपाती कारवायांच्या बिमोडासाठी केंद्राला आखावी लागणार नवी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 08:37 AM2024-09-15T08:37:35+5:302024-09-15T08:38:48+5:30

जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता दहशतवाद्यांच्या बीमोडासाठी केंद्र सरकारला नवीन रणनीती आखावी लागणार आहे.

14 jawans martyred in 13 attacks, Center will have to plan a new strategy for the prevention of ambush activities | १३ हल्ल्यांत १४ जवान शहीद, घातपाती कारवायांच्या बिमोडासाठी केंद्राला आखावी लागणार नवी रणनीती

१३ हल्ल्यांत १४ जवान शहीद, घातपाती कारवायांच्या बिमोडासाठी केंद्राला आखावी लागणार नवी रणनीती

श्रीनगर :जम्मू-काश्मीरमध्ये मागील ७५ दिवसांत दहशतवाद्यांनी १३ हल्ले केले असून, त्यात भारतीय लष्कराचे १४ जवान शहीद तर ७ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्याऐवजी आता जम्मूला लक्ष्य केले आहे. त्यामुळे तिथे घातपाती कारवायांचे प्रमाण वाढले आहे. हे बदल लक्षात घेता, तसेच जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता दहशतवाद्यांच्या बीमोडासाठी केंद्र सरकारला नवीन रणनीती आखावी लागणार आहे.

मविआच्याच गळ्यात टाका ‘फेक नरेटिव्ह’; नड्डा यांचे भाजपच्या बैठकीत आदेश

१३ व १४ सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड व बारामुल्ला येथे दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी मोहीम राबविली. बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. जून ते १४ सप्टेंबर या कालावधीतील दहशतवादी हल्ल्यांचा तपशील बघितला, तर १३ हल्ले दहशतवादी हल्ले झाले.

९ जून २०२४ : शिवखोडी येथे झालेल्या यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १० यात्रेकरू ठार व ४० जण जखमी झाले.

११ जून २०२४ : डोडा, भद्रवाह येथे पोलिस, लष्कराच्या एका छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात सात जवान जखमी झाले.

७ जुलै २२४ : राजौरीत सुरक्षा दलाच्या चौकीवर झालेल्या हल्ल्यात एक जवान जखमी झाला.

८ जुलै २०२४ ला रोजी कठुआ येथील हल्ल्यात ५ जवान शहीद झाले.

१६ जुलै २०२४ : दोडातील जंगलात लष्करी जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले.

२२ जुलै २०२४ : राजौरीत गुंदा क्वास येथे शौर्यचक्राने सन्मानित बीडीसी सदस्याच्या घरी हल्ला केला. त्यात लष्कराचा एक जवान जखमी झाला.

२७ जुलै २०२४ : कुपवाडा भागातील मछिल क्षेत्रात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार व एक जवान शहीद झाला.

१३ ऑगस्ट २०२४ : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांबरोबर चकमक झाली. त्यात अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे २ जवान शहीद व एका नागरिकाचा मृत्यू झाला.

२४ ऑगस्ट २०२४ : सोपोर येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.

२९ ऑगस्ट २०२४ : कुपवाडा येथे सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

८ डिसेंबर २०२४ : रोजी लाम व नौशेरा भागात चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

१३ सप्टेंबर २०२४ : झालेल्या किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद व दोन जवान जखमी झाले.

१४ सप्टेंबर २०२४ : बारामुल्ला जिल्ह्यात चक टपर क्रीरी परिसरात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

Web Title: 14 jawans martyred in 13 attacks, Center will have to plan a new strategy for the prevention of ambush activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.