ट्रक कालव्यात कोसळून उत्तर प्रदेशात १४ ठार

By Admin | Published: May 6, 2017 01:08 AM2017-05-06T01:08:49+5:302017-05-06T01:08:49+5:30

टिळ्याच्या कार्यक्रमानंतर घरी परतणाऱ्या लोकांचा छोटा ट्रक कालव्यात कोसळून १४ ठार, तर २८ जण जखमी झाले. उत्तर प्रदेशात

14 killed in truck collapse in Uttar Pradesh | ट्रक कालव्यात कोसळून उत्तर प्रदेशात १४ ठार

ट्रक कालव्यात कोसळून उत्तर प्रदेशात १४ ठार

googlenewsNext

एटा (उत्तर प्रदेश) : टिळ्याच्या कार्यक्रमानंतर घरी परतणाऱ्या लोकांचा छोटा ट्रक कालव्यात कोसळून १४ ठार, तर २८ जण जखमी झाले. उत्तर प्रदेशात शुक्रवारी ही भयंकर दुर्घटना घडली.
हा ट्रक आग्रा येथून परतत असताना जलेसर भागातील सराई नीम येथे पहाटे ३ वाजता ही दुर्घटना घडली. दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान घोषित केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये, गंभीर जखमींना ५० हजार रुपये, तर किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांची भरपाई घोषित केली. गिरंद सिंह (६५), प्रशांत (१२), लवकुश (२१), मुकेश (२३), नेरापाल (२५), पद्मसिंह (५०), ओमवीर (१९), शैतानसिंह (५०), पद्मसिंह (४०), बनीसिंह (४५), राजेंद्र (६०), विजय (२२), परवेंद्र फौजी (३५) आणि संजू (२५), अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण जागीच ठार झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.२८ जखमींपैकी १६ जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी आग्रा येथे पाठविण्यात आले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली.  (वृत्तसंस्था)



 

Web Title: 14 killed in truck collapse in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.