14 लाख कोटी जमा झाल्याने मोदींचा निर्णय फसला ?
By Admin | Published: December 28, 2016 11:44 AM2016-12-28T11:44:53+5:302016-12-28T11:46:57+5:30
500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयानंतर एका झटक्यात 15.4 लाख कोटी रुपये चलनातून बाद झाले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयानंतर एका झटक्यात 15.4 लाख कोटी रुपये चलनातून बाद झाले. त्यानंतर आतापर्यंत जुन्या नोटांमधील 14 लाख कोटी रुपये पुन्हा बँकेत जमा झाले आहेत. बँकेत एकूण जमा झालेल्या जुन्या नोटांचे मुल्य सरकारच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर तीन लाख कोटींपर्यंत रक्कम पुन्हा बँकिंग व्यवस्थेत येणार नाही, इतकी रक्कम ब्लॅकमनीमध्ये असेल असा सरकारचा अंदाज होता. पण 90 टक्के रद्द चलन बँकेत डिपॉझिट झाल्यामुळे काळा पैसेवाल्यांना आपला बेहिशोबी पैसा अधिकृत करण्याचा मार्ग सापडला असे दिसते.
प्रतिव्यक्ती 2.50 लाखापर्यंत रक्कम बँक खात्यात जमा करण्याची मर्यादा आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम खात्यात जमा झाल्यामुळे कर उत्पन्नात वाढ होईल अशी सरकारला आशा आहे.