टीव्हीवरील रामावर १४ लाख रुपयांचे कर्ज, मेरठमधून भरला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 10:35 AM2024-04-03T10:35:30+5:302024-04-03T10:36:21+5:30
‘रामायण’ या मालिकेतून प्रभू श्रीरामांच्या भूमिकेमुळे घराेघरी पाेहाेचलेले अभिनेते अरुणचंद्र प्रकाश गाेविल यांनी मेरठ मतदारसंघातून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
मेरळ : ‘रामायण’ या मालिकेतून प्रभू श्रीरामांच्या भूमिकेमुळे घराेघरी पाेहाेचलेले अभिनेते अरुणचंद्र प्रकाश गाेविल यांनी मेरठ मतदारसंघातून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने त्यांना काही दिवसांपूर्वी तिकीट जाहीर केले हाेते. त्यांच्यावर ॲक्सिस १४ लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असल्याचे त्यांच्या उमेदवारी अर्जासाेबत जाेडलेल्या शपथपत्रातून स्पष्ट झाले. गाेविल यांच्याकडे मर्सिडीज कारही आहे.
- बॅकेत जमा : १.०३ काेटी रुपये
-राेख रक्कम : ३.७५ लाख रुपये
- स्वत:कडे साेने : २२० ग्रॅम
किंमत : १० लाख ९३ हजार रुपये
- पत्नीकडील साेने : ६०० ग्रॅम,
किंमत : ३२ लाख रुपये
- भूखंड : १३ हजार चाैरस फुटांचा भूखंड पुण्यात आहे. ४.२५ काेटी रुपये याची किंमत आहे.
- फ्लॅट : १,१२७ चाैरस फुटांचा मुंबईत अंधेरी येथे फ्लॅट आहे. त्याची किंमत २ काेटींहून अधिक आहे.
- कार : ६२ लाख रुपये किमतीची मर्सिडीज कार.
- गुंतवणूक : १६.५१ लाख रुपयांची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आहे.