१४... मौदा.... जलसमाधी
By Admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:05+5:302015-02-14T23:51:05+5:30
मजुरासह तीन जनावरांना जलसमाधी
म ुरासह तीन जनावरांना जलसमाधीबोरगाव शिवार : सांड नदीतील घटनामौदा : गुरांना पाणी पाजण्यासाठी नदीच्या पात्रात उतरलेल्या मजुरासह तीन जनावरांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मौदा तालुक्यातील बोरगाव शिवारातील सांड नदीच्या पात्रात शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. पंजाब रतीराम भोंदे (५१, चिचोली, ता. मौदा) असे मृत मजुराचे नाव आहे. पंजाब हा बोरगाव येथील रामविलास गुप्ता यांच्याकडे नोकर (सालगडी) म्हणून काम करायचा. तो शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे बैलगाडीने शेतात जायला निघाला. त्याने बैलगाडीला दोन गाई व एक वासरूही बांधले होते. शेताच्या मार्गात सांड नदी असल्याने त्याने नदीच्या पात्रात बैलगाडी थांबविली. त्याचवेळी बैलगाडीला जुंपलेले बैल व मागे बांधलेल्या गाई व वासरूही पाणी पित होते. पंजाब हा बैलगाडीवरच बसला होता. दरम्यान, बैलांनी बैलगाडी पुढे ओढत खोल पाण्यात नेली. बैलगाडीवरून उडी मारून पाण्याबाहेर येणे शक्य नसल्याने जनावरांसह तोही खोल पाण्यात बुडाला. काही वेळाने बोरगाव येथील ग्रामस्थ नदीकडे आले असता त्यांना नदीच्या पाण्यात जनावरे तरंगाना आढळून आले. ही बातमी गावात कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यातच मौदा पोलिसांना सदर घटनेची सूचना देण्यात आली. पोलिसांनी मौदा येथील काही कोळी बांधवांना पाचारण केले. त्यांनी दोन्ही गाई व वासराचा मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर पंजाबच्या मृतदेहाचा शोध घेतला. तीन तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना पंजाबचा मृतदेह गवसला. पंजाबला खुशाल नावाचा एकुलता एक मुलगा आहे. पंजाबच्या पत्नीचा दोन वर्षांपूर्वी विहिरीत पडून मृत्यू झाला. आता वडिलाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने खुशाल पोरका झाला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)***