मध्य प्रदेशमध्ये रेशनिंग दुकानाला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू

By admin | Published: April 21, 2017 08:12 PM2017-04-21T20:12:22+5:302017-04-21T20:12:22+5:30

छिंदवाडा जिल्ह्यातील एका रेशनिंग दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला

14 people died in a rationing shop in Madhya Pradesh | मध्य प्रदेशमध्ये रेशनिंग दुकानाला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशमध्ये रेशनिंग दुकानाला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत
मध्य प्रदेश, दि. 21 - छिंदवाडा जिल्ह्यातील एका रेशनिंग दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. एका दुकानात अचानक भीषण आग लागल्यानं 14 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 3 लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छिंदवाडा जिल्ह्यात एका रेशनिंगच्या दुकानात रॉकेलचं वाटप सुरू होतं. त्याच वेळी अचानक भीषण आग लागली आणि उपस्थित आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळले. रॉकेलच्या वितरणावेळी तिथे डझनांहून अधिक लोक उपस्थित होते. अचानकपणे रॉकेलच्या डब्यात आग भडकली. आग क्षणभरात पसरल्यानं दुकानातील हॉलमध्ये आगीच्या ज्वाळा पसरल्या. या आगीत 14 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंहांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना 4 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.

Web Title: 14 people died in a rationing shop in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.