अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 14 जणांचा मृत्यू

By admin | Published: July 11, 2017 07:07 PM2017-07-11T19:07:06+5:302017-07-11T19:32:06+5:30

अरुणाचल प्रदेशातील पापुम परे जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात 14 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

14 people killed in landslides in Arunachal Pradesh | अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 14 जणांचा मृत्यू

अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 14 जणांचा मृत्यू

Next
ऑनलाइन लोकमत
इटानगर, दि. 11 - अरुणाचल प्रदेशातील पापुम परे जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात 14 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पापुम परे जिल्ह्यातील गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असून यामुळे येथील लापताप गावात दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास भूस्खलनाची घटना घडली.
यामध्ये आत्तापर्यंत 14 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, अनेक जण भूस्खलनात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच, लापताप गावातील तीन घरांवर मोठी दरड कोसळल्याची माहिती, अतिरिक्त उपायुक्त जलश पेर्टिन यांनी दिली.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्विटरवरुन या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, पापुम परे जिल्ह्यातील लापताप गावातील भूस्खलनामुळे झालेल्या जिवीत जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख झाले. या घटनेत आणखी काही जण गाडले गेल्याची शक्यता आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, राज्य पोलीस आणि मेडिकल टीम पोहचली असून बचावकार्य सुरु आहे. 

(बांगलादेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 100 लोकांचा मृत्यू)

(उत्तराखंडच्या भूस्खलनात अडकलेले नाशिकचे भाविक सुखरूप)

(बद्रिनाथ येथे भूस्खलनात नगरचे भाविक अडकले)

  

Web Title: 14 people killed in landslides in Arunachal Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.