१४ राज्यात ५० टक्के नवजात, महिला अशक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 12:16 PM2021-11-26T12:16:38+5:302021-11-26T12:19:16+5:30
रुग्णालयातील प्रसूतींचे राष्ट्रीय प्रमाण ८९ टक्के
नवी दिल्ली : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील १४ राज्यांमध्ये नवजात बालके व प्रसूती झालेली महिला यांच्यापैकी निम्मे लोक अत्यंत अशक्त प्रकृतीचे आढळून आले. पाच वर्षे वयाखालील अशक्त मुलांची संख्या ६७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. याचा अर्थ भारतात पाच वर्षे वयाखालील दर तीन मुलांपैकी दोन मुले अशक्त आहेत. १५ ते १९ वर्षे वयोगटातील व अशक्त असलेल्या मुलींचे प्रमाण ५७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
रुग्णालयातील प्रसूतींचे राष्ट्रीय प्रमाण ८९ टक्के
रुग्णालयात प्रसूती होण्याचे देशपातळीवरील एकूण प्रमाण ७९ वरून ८९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. काही राज्यात हे प्रमाण १०० टक्के आहे. सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील राज्यांपैकी ७ राज्यात ही आकडेवारी ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. शहरी भागामध्ये रुग्णालयात प्रसूती होण्याची आकडेवारी ९३.८ टक्के तर ग्रामीण भागामध्ये ८६.७ टक्के आहे.