१४... सारांश
By admin | Published: February 14, 2015 11:52 PM2015-02-14T23:52:04+5:302015-02-14T23:52:04+5:30
सावंगी येथे कुपोषण जनजागृती अभियान
Next
स वंगी येथे कुपोषण जनजागृती अभियानकोदामेंढी : नजीकच्या सावंगी येथे स्वच्छता व कुपोषण जनजागृती अभियान राबविण्यात आले. यात ज्योती वरठी, मंगला देशमुख, लक्ष्मण परतेती, अर्जुन बावनकुळे, विठ्ठल महाकाळकर, नारायण हूड, वामन जुगनायके, मारोती बावनकुळे, मंदा वरखडे, प्रल्हाद मुंदे, देवचंद कुंभरे, रायवंता कोडवते, सुनील हूड, वंदना धुर्वे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.***गतिरोधक तयार करण्याची मागणीतारसा : मौदा-रामटेक मार्गावरील तारसा नजीकच्या वळणावर नेहमीच अपघात होतात. पूर्वी या वळणावर गतिरोधक तयार केले होते. मार्गाच्या दुरुस्तीमध्ये ते काढण्यात आले. अपघाताला आळा घालण्यासाठी या वळणावर गतिरोधक तयार करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.***तारसा येथे कृत्रिम पाणीटंचाईतारसा : स्थानिक थ्री फेस व सिंगल फेस लाईमध्ये वारंवार बिघाड निर्माण होतो. हा बिघाड दुरुस्त करण्यात लाईनमन हयगय करीत असल्याने वीजपुरवठ्याअभावी पाण्याची टाकी भरल्या जात नाही. त्यामुळे गावकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या सोडविण्याची मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे. ***जलयुक्त शिवार अभियानाला सुरुवात साळवा : कुही तालुक्यातील साळवा येथे जलयुक्त शिवार अभियानाला नुकतीच सुरुवात करण्यात आली. यात मामा तलावांचे खोलीकरण करण्यात येणार असून, कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव शेततळ्यांची निर्मिती व साफसफाई केली जाणार आहे. सदर अभियान लोकसहभागातून राबिवण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ***सुरक्षा रक्षकांची परवडरामटेक : शहरातील बहुतांश एटीएम मशीनजवळ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. त्या सुरक्षा रक्षकांना संबंधित संस्था अत्यल्प वेतन देत असल्याने त्या वेतनात त्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाह करताना कसरत करावी लागत आहे. शासनाने या सुरक्षा रक्षकांच्या अवस्थेची दखल घेऊन त्यांचे वेतन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी जोर धरत आहे.***