भयंकर! सॅनिटायझरमुळे झालं असं काही की 14 वर्षीय मुलाला गमवावा लागला जीव, वेळीच व्हा सावध; अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 08:38 AM2021-01-12T08:38:51+5:302021-01-12T08:47:46+5:30

Sanitizer News : हँड सॅनिटायझरचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र सॅनिटायझरमुळे एका 14 वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे.

14 year old child dies in fire in sanitizer filled glass | भयंकर! सॅनिटायझरमुळे झालं असं काही की 14 वर्षीय मुलाला गमवावा लागला जीव, वेळीच व्हा सावध; अशी घ्या काळजी

भयंकर! सॅनिटायझरमुळे झालं असं काही की 14 वर्षीय मुलाला गमवावा लागला जीव, वेळीच व्हा सावध; अशी घ्या काळजी

Next

नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून एक कोटीवर पोहोचला आहे. सध्या कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी हात स्वच्छ ठेवण्याचं सांगितलं जातं. त्यामुळे हँड सॅनिटायझरचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र सॅनिटायझरमुळे एका 14 वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. सॅनिटायझरमुळे लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू झाला आहे. आगीत होरपळलेल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजनगर येथे राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाचा सॅनिटायझरमुळे लागलेल्या आगीत मृत्यू झाला आहे. विशेष असं या मुलाचं नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी तो आपल्या काही मित्रांसोबत खेळत होता, तेव्हा ही घटना घडली आणि सोमवारी उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला आहे. चंदननगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष एका दुकानाजवळ मित्रांसोबत खेळत होता. तेव्हा त्याला दुकानाच्या आत 5 लिटरचा सॅनिटायझरचा कॅन दिसला. मित्रांच्या मदतीने त्याने एका ग्लास सॅनिटायझर ओतून घेतलं आणि माचिसने ते जाळायचा प्रयत्न केला. 

इन्फेक्शन शरीरात पसरलं

सॅनिटायझरने पेट घेतल्यावर घाबरुन मुलाने हातात असलेलं सॅनिटायझर फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र हे करत असताना ते त्याच्याच अंगावर पडलं. त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण ते इन्फेक्शन त्याच्या शरीरात पसरलं होतं. दोन दिवस सुरू असलेल्या उपचारानंतर रविवारी विशेषला अरबिंदो रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याची प्रकृती गंभीर झाली होती व त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. पोस्टमार्टम केल्यानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला आहे. 

फॉरेन्सिक विभागाने याचा तपास केला असून सॅनिटायझरचे काही सँपल घेतले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. टीआय योगेश तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुलाच्या कुटुंबाला याचा मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. हँड सॅनिटायझर लावून दिवे अथवा मेणबत्ती पेटवणे महागात पडू शकतं. त्यामुळे आता दिवे लावण्याआधी अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरचा वापर करू नका असे सांगण्यात आले आहे. अल्कोहोल हा ज्वलनशील पदार्थ आहे. दिवे लावताना त्याचे काही प्रमाण जर हातावर असेल तर ते पेटही घेऊ शकते. यामुळे हात भाजण्याची शक्यता ही अधिक असते. यासंदर्भात केंद्र सरकारने जनतेला सूचना दिल्या आहेत.

सॅनिटायझर वापरून दिवा लावणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण 

दिवे किंवा मेणबत्ती लावताना हँड सॅनिटायझरचा वापर टाळावा, असे आवाहन डॉक्टरांनी देखील केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत दिवसातून कित्येकदा याचा वापर करीत आहे. अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझमुळे हातावरील कोरोनाचा विषाणू नष्ट होण्यास मदत होते. मात्र यामध्ये ‘आयसो प्रोपाईल अल्कोहल’, ‘इथेनॉल’ किंवा ‘एन-प्रोपेनॉल’चे 60 ते 90 टक्के मिश्रण असते. हे उच्च ज्वलनशील पदार्थ आहेत. यामुळे दिवे किंवा मेणबत्ती पेटविताना हाताला सॅनिटायझर लावू नका, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. मेणबत्ती किंवा दिवे लावण्याचा प्रयत्न केल्यास सॅनिटायझर लावलेले हात पेट घेऊ शकतात. मोठा धोका होऊ शकतो. यामुळे स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा दिवे लावताना या सॅनिटायझरचा वापर करू नये, केला असल्यास हात धुवावेत असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Web Title: 14 year old child dies in fire in sanitizer filled glass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.