FTIIच्या विद्यार्थ्यांचा संप निष्पन्नाशिवाय १४० दिवसांनी मागे
By admin | Published: October 28, 2015 03:10 PM2015-10-28T15:10:24+5:302015-10-28T15:10:24+5:30
फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट अर्थात FTII या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी १४० दिवस सुरू असलेला संप आज बुधवारी अखेर मागे घेतला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २८ - फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट अर्थात FTII या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी १४० दिवस सुरू असलेला संप आज बुधवारी अखेर मागे घेतला आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियु्क्ती केल्याचा निषेध व्यक्त करतानाच आणखी चार नियुक्त्यांबाबत विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. भाजपा सरकार भगवी विचारसरणी सगळ्या संस्थांवर लादत असून अकार्यक्षम अधिका-यांना नियुक्त करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
सिनेमा क्षेत्रातून तसेच कला क्षेत्रातून अनेक दिग्गजांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला, परंतु सरकारने न झुकता आपला हट्ट कायम ठेवला. अखेर सरकार व विद्यार्थी यांच्यात चर्चेच्या अनेक फे-या झडल्या, परंतु त्यातून समाधानकारक निष्पन्न निघाले नाही.
तब्बल १४० दिवसांनंतर विद्यार्थ्यांनी संप मागे घेतला असून संघर्ष सुरूच राहणार असल्याचे सांगितले. सगळे विद्यार्थी आपापल्या वर्गात दाखल होतील मात्र या नियुक्त्यांविरोधात शांततापूर्ण मार्गाने ते निषेध करीत राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.