पाऊस, पुराच्या तडाख्याने यंदा १,४०० जणांचा बळी; १६५ जिल्ह्यांंना बसला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 02:25 AM2018-09-04T02:25:59+5:302018-09-04T02:26:34+5:30

यंदा पावसाळ्यात संततधार, पूर, दरडी कोसळणे यासारख्या घटनांमुळे देशातील दहा राज्यांमध्ये आतापर्यंत १४००हून अधिक लोक मरण पावले आहेत. त्यामध्ये केरळमधील ४८८ बळींचाही समावेश आहे.

1,400 people killed this year due to rain and floods; 165 districts effects | पाऊस, पुराच्या तडाख्याने यंदा १,४०० जणांचा बळी; १६५ जिल्ह्यांंना बसला मोठा फटका

पाऊस, पुराच्या तडाख्याने यंदा १,४०० जणांचा बळी; १६५ जिल्ह्यांंना बसला मोठा फटका

Next

नवी दिल्ली : यंदा पावसाळ्यात संततधार, पूर, दरडी कोसळणे यासारख्या घटनांमुळे देशातील दहा राज्यांमध्ये आतापर्यंत १४००हून अधिक लोक मरण पावले आहेत. त्यामध्ये केरळमधील ४८८ बळींचाही समावेश आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अख्यत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती निवारण केंद्राने दिलेल्या माहितीनूसार केरळमध्ये यंदा पावसाळ््यात ४८८ लोक मरण पावले व तेथील १४ जिल्ह्यांतल्या ५४.११ लाख लोकांना पूर, मुसळधार पावसाचा फटका बसला.
त्या राज्यात १४.५२ लाख लोक सध्या निवारा शिबिरांमध्ये राहात होते. तसेच ५७,२०४ हेक्टर शेतजमिनीतील पिकांचे नुकसान झाले. पावसानंतरच्या दुर्घटनांमुळे केरळमध्ये ४४ जण, उत्तर प्रदेशमध्ये १४, उत्तराखंडमध्ये ६, पश्चिम बंगालमध्ये ५, कर्नाटकामध्ये ३ जण बेपत्ता आहेत तर १० राज्यांमध्ये अशा दुर्घटनांत ३८६ जण जखमी झाले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: 1,400 people killed this year due to rain and floods; 165 districts effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.