उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा कहर; 15 जणांचा मृत्यू; 133 इमारती कोसळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 11:42 AM2019-07-13T11:42:40+5:302019-07-13T12:07:38+5:30
उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सलग तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
लखनऊ - उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सलग तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 14 जिल्ह्यांना या जोरदार पावसाचा फटका बसला आहे. वादळी वारा आणि वीज पडल्यामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तब्बल 133 इमारती कोसळल्या असल्याने अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील सर्व जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. एकंदरीत पावसामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. जोरदार पावसाचा फटका हा जनावरांना देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. 133 इमारती कोसळल्या आहेत. अनेकजण जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांची घरं आणि सार्वजनिक मालमत्ता यांचे मोठे नुकसान झाले आहे.
15 dead, 133 buildings collapse as rainfall wreaks havoc in UP
— ANI Digital (@ani_digital) July 13, 2019
Read @ANI Story | https://t.co/LeJsTMci6Zpic.twitter.com/2LvITp636v
उन्नाव, आंबेडकर नगर, प्रयागराज, बाराबंकी, हरदोई, लखीमपूर खीरी, गोरखपूर, कानपूर नगर, पीलीभीत, सोनभद्र, चंदौली, फिरोजाबाद, मऊ आणि सुल्तानपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. रस्त्यावरील झाडं उन्मळून पडली आहेत. तसेच परिसराचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत अशाच पद्धतीचा जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच पुढच्या पाच दिवसांत उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
Prayagraj: Normal life gets affected at Sangam after water level of river Ganga increases following heavy rainfall. pic.twitter.com/O32mJnH1FM
— ANI UP (@ANINewsUP) July 13, 2019
आसाममध्ये देखील मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माम झाली आहे. ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. जवळपास चार लाख लोकांना जोरदार पावसाचा फटका बसला आहे. आसामच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, नलबारी, चिरांग, गोलाघाट, मजुली, जोरहाट, दिब्रुगड, नागाव, मोरीगाव, कोक्राझर, बोंगाईगाव, बाकसा, सोनितपूर, दरांग आणि बारपेटा हे जिल्ह्यांना पावसाचा फटका बसल्याची माहिती दिली आहे. पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.