हरियाणात बसमध्ये स्फोट, 15 जखमी

By admin | Published: June 7, 2016 12:28 PM2016-06-07T12:28:22+5:302016-06-07T12:28:22+5:30

फतेहबाद येथे बसमध्ये स्फोट झाला असून या स्फोटात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. स्फोट झाला त्यावेळी बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते

15 injured in blast in Haryana | हरियाणात बसमध्ये स्फोट, 15 जखमी

हरियाणात बसमध्ये स्फोट, 15 जखमी

Next
ऑनलाइन लोकमत 
हरियाणा, दि. 07 - फतेहबाद येथे बसमध्ये स्फोट झाला असून या स्फोटात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. स्फोट झाला त्यावेळी बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते. बस भूना रोडवर असताना हा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार स्फोटात कोणताही प्रवासी गंभीर जखमी झालेला नाही. स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट देण्यात आलेला आहे. दहशतवादी संघटनेने हा स्फोट केला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 
 
हरियाणामध्ये याअगोदरही दोन बसमध्ये स्फोट झाले आहेत ज्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे. यामधील एक स्फोट सोनीपतहून चंदिगडला जाणा-या बसमध्ये तर दुसरा पानीपतजवळील रेल्वे स्टेशनजवळ झाला होता. 
 

Web Title: 15 injured in blast in Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.