कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पत्रकाराच्या कुटुंबाला १५ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 06:20 AM2021-05-03T06:20:22+5:302021-05-03T06:20:50+5:30
कोरोनामुळे पत्रकाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला १५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल.
भुवनेश्वर : ओडिशात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यातील पत्रकारांना कोविड योद्धा जाहीर केले आहे. कोरोनामुळे पत्रकाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला १५ लाख रुपये देण्याची घोषणा पटनायक यांनी केली आहे.
याबाबतच्या एका प्रस्तावाला मंजुरी देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, साथीच्या काळात पत्रकार बातम्या देऊन राज्याची मोठी सेवा करत आहेत. कोरोनाबाबतची माहिती ते लोकांपर्यंत पोहचवित आहेत. राज्यातील ६,९४४ पत्रकारांचा समावेश गोपबंधू संबादिका आरोग्य विमा योजनेत करण्यात आला आहे. त्यांना दोन लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळत आहे. यात असेही म्हटले आहे की, कोरोनामुळे पत्रकाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला १५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल.