घटस्फोटित पत्नीला दरमहा दीड लाख पोटगी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 08:18 AM2023-09-01T08:18:56+5:302023-09-01T08:19:12+5:30
पोटगीबरोबरच ओमर अब्दुल्ला यांनी मुलाच्या शिक्षणासाठी दरमहा साठ हजार रुपये द्यावेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपली घटस्फोटित पत्नी पायल अब्दुल्ला यांना दर महिना दीड लाख रुपये पोटगी द्यावी, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला.
पोटगीबरोबरच ओमर अब्दुल्ला यांनी मुलाच्या शिक्षणासाठी दरमहा साठ हजार रुपये द्यावेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. २०१८ साली या प्रकरणाचा खटला सुरू असलेल्या कनिष्ठ न्यायालयाने असा आदेश दिला होता. पत्नी उच्चशिक्षित असली तरी पोटगीच्या हक्कापासून तिला वंचित ठेवता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.