१५ लाख रुग्ण सर्दी, तापाने बेजार खाजगी वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज : २०१२ नंतर सर्वात मोठा डेंग्यूचा कहर

By admin | Published: September 20, 2016 10:52 PM2016-09-20T22:52:15+5:302016-09-20T22:52:15+5:30

जळगाव : जिल्हाभरात ५० लाख लोकसंख्या आहे. पैकी तब्बल १५ लाख नागरिक हे सर्दी, ताप यामुळे बेजार झाले आहेत. यात डेंग्यूसदृश व डेंग्यूच्या रुग्णांचादेखील समावेश आहे. २०१२ नंतर डेंग्यूचा सर्वात मोठा कहर झाला असून, शहरी व ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या एकसारखीच असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

1.5 million patients with cold, fever-free private medical practice: 2012 after the biggest dengue fever | १५ लाख रुग्ण सर्दी, तापाने बेजार खाजगी वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज : २०१२ नंतर सर्वात मोठा डेंग्यूचा कहर

१५ लाख रुग्ण सर्दी, तापाने बेजार खाजगी वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज : २०१२ नंतर सर्वात मोठा डेंग्यूचा कहर

Next
गाव : जिल्हाभरात ५० लाख लोकसंख्या आहे. पैकी तब्बल १५ लाख नागरिक हे सर्दी, ताप यामुळे बेजार झाले आहेत. यात डेंग्यूसदृश व डेंग्यूच्या रुग्णांचादेखील समावेश आहे. २०१२ नंतर डेंग्यूचा सर्वात मोठा कहर झाला असून, शहरी व ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या एकसारखीच असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
यंदा पावसाचे प्रमाण बर्‍यापैकी आहे. पावसाचे पाणी सतत तुंबून राहिल्याने त्यात डेंग्यू डासांच्या अळ्यांची निर्मिती झाली. अळ्या नष्ट करण्यासाठी वेळीच उपाययोजना न झाल्याने डेंग्यूचा फैलास वेगाने झाला.
सोबत सर्दी, ताप, खोकला, निमोनिया यामुळे रुग्ण बेजार झाले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच बेजार आहेत.
यात डेंग्यूच्या रुग्णांसह इतर रुग्णांनाही डेंग्यूसंबंधीची तपासणी व इतर खर्चाचा फटका बसत आहे. डेंगूच्या तपासणीसाठी किंवा चाचण्यांसाठी एक हजार रुपये खर्च येतो. शासन फक्त दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना तपासणीसंबंधी मदत करते, पण इतर रुग्णांना मदत मिळत नाही. तपासण्यांचा खर्च परवडणारा नसल्याने आजार अधिकचा त्रासदायक बनत आहे.
कुंड्या, पाण्याच्या मोठ्या टाक्या यातही डासांची उत्पत्ती होत आहे. तसेच पावसाचे पाणी महिनाभर तुंबून राहिलेल्या ठिकाणीदेखील डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. शहरांमध्ये खुले भूखंड डेेंग्यूच्या फैलावास अधिक कारणीभूत ठरत आहेत.

१० जुलैपासून साथ
जिल्‘ात १० जुलैपासून डेंग्यूची साथ पसरली. ती आटोक्यात आलीच नाही. जि.प. व जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा गाफील राहिल्याने ही स्थिती निर्माण झाली. सप्टेंबर महिन्यात ही साथ अधिक भीषण बनली आहे.

जि.प.च्या आरोग्य विभागातर्फे रोज ५०० घरांचे सर्वेक्षण
जि.प.च्या आरोग्य विभागातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून रोज ५०० घरांचे सर्वेक्षण केले जात आहे. मंगळवारी १०० पेक्षा अधिक भांडी, टाक्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्यात आल्याची माहिती मिळाली. परंतु मंगळवारी डेंग्यूसंबंधीची तिव्रता कमी झाल्याचा दावा जिल्हा आरोग्याधिकारी बी.आर.पाटील यांनी केला.

Web Title: 1.5 million patients with cold, fever-free private medical practice: 2012 after the biggest dengue fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.