सीमेवर तैनात होणार नव्या १५ पलटणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:44 AM2018-01-15T01:44:33+5:302018-01-15T01:44:42+5:30
पाकिस्तान, बांगलादेश व चीन लगतच्या सीमेवर तैनात आयटीबीपी व बीएसएफ या निमलष्करी दलात नव्या १५ पलटणींचा (बटालियन) समावेश करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तान, बांगलादेश व चीन लगतच्या सीमेवर तैनात आयटीबीपी व बीएसएफ या निमलष्करी दलात नव्या १५ पलटणींचा (बटालियन) समावेश करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे.
यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, पंधरा नव्या पलटणींमध्ये बीएसएफच्या सहा व आयटीबीपीच्या नऊ पलटणी असतील. प्रत्येक पलटणीमध्ये अधिकारी व सैनिक मिळून हजार जण असतील. या संदर्भात बीएसएफच्या सूत्रांनी सांगितले की, नव्या पलटणीतले सैनिक आसाम व पश्चिम बंगालला लागून असलेल्या बांगलादेशच्या सीमेवर तसेच पंजाब व काश्मीरला लागून असलेल्या पाकिस्तान सीमेवरही तैनात सैनिकांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. पाकिस्तान व बांगलादेशला लागून असलेल्या सीमाभागात सुरू असलेले घुसखोरी, अमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी, अवैध स्थलांतरण हे गैरप्रकार रोखण्यासाठी तिथे तैनात सैनिकांची संख्या वाढविणे आवश्यक बनले आहे. नव्या पलटणी स्थापन झाल्यानंतर, त्यातील सैनिकांना नेमके कुठे तैनात करायचे, हे योग्य वेळी ठरविण्यात येईल.
आयटीबीपीचे सैनिक चीनला लागून असलेल्या सुमारे साडेतीन हजार किमी लांबीच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहेत.